परभणी : पावसाळ्यातही गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:42 AM2019-08-08T00:42:39+5:302019-08-08T00:43:08+5:30

भर पावसाळ्यात ही गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडलेले असल्याची स्थिती गंगाखेड तालुक्यात पाहावयास मिळत आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असली तरी गंगाखेड तालुक्यात मात्र गोदावरी नदीच्या पात्रात गाजर गवत, बाभळीची व रुचकीची झाडे वाढली असून, सर्वत्र प्लास्टिकचा कचरा पडलेला पहावयास मिळत आहे.

Parbhani: The Godavari river is dry even in the rainy season | परभणी : पावसाळ्यातही गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाकच

परभणी : पावसाळ्यातही गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाकच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : भर पावसाळ्यात ही गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडलेले असल्याची स्थिती गंगाखेड तालुक्यात पाहावयास मिळत आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असली तरी गंगाखेड तालुक्यात मात्र गोदावरी नदीच्या पात्रात गाजर गवत, बाभळीची व रुचकीची झाडे वाढली असून, सर्वत्र प्लास्टिकचा कचरा पडलेला पहावयास मिळत आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अद्यापपर्यंत गंगाखेड तालुका व परिसरात जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रात पाण्याऐवजी वाळू उपशाचे खड्डे, येड्या बाभळी, रुचकीची झाडे, काटेरी झुडपं, गाजर गवत, प्लास्टिकचा कचरा जमा झाल्याचे गोदावरी नदी पात्रात पहावयास मिळत आहे. तालुक्याच्या प्रारंभापासून ते शेवटपर्यंत हीच परिस्थिती असल्याने गोदावरी काठावरील गावांमध्ये आजही पाणीटंचाई जाणवत आहे. गोदावरी नदी केव्हा दुथडी भरुन वाहते, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. गंगाखेड शहरातून वाहणाºया गोदावरी नदी पात्रात शहरातील घाण पाणी वाहून नेणाºया नाल्यातील पाण्याचे डबके नदी पात्रात साचले आहेत.
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
४गोदावरी नदी पात्रामुळे दक्षिण काशी म्हणून ओळख मिळालेल्या गंगाखेड तालुक्यात गोदावरी नदी पात्रात अस्थी विसर्जन व इतर धार्मिक कार्य करण्यासाठी येणाºया भाविकांना आंघोळ व इतर धार्मिक विधीसाठी पाणी मिळत नाही.
४पात्राच्या दुरवस्थेबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन स्वच्छतेच्या बाबतीत किमान भविष्य काळासाठी काही उपाय योजना आखाव्यात, अशी मागणी गंगाखेड तालुक्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Parbhani: The Godavari river is dry even in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.