परभणी : गंगाखेड शुगरच्या मॉलेसेस टाकीला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:38 IST2017-12-27T00:38:28+5:302017-12-27T00:38:33+5:30
गंगाखेड शुगर एनर्जी कारखान्यातील मॉलेसेसच्या दोन टाक्यांना आग लागल्याची घटना २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली़

परभणी : गंगाखेड शुगरच्या मॉलेसेस टाकीला लागली आग
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड: गंगाखेड शुगर एनर्जी कारखान्यातील मॉलेसेसच्या दोन टाक्यांना आग लागल्याची घटना २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली़
विजयनगर माखणी येथे असलेल्या गंगाखेड शुगर अँड एनर्जी साखर कारखाना परिसरात १२ हजार मे़ टन क्षमतेच्या चार मॉलेसेस टाक्यांपैकी एक व तीन क्रमांकाच्या टाक्यांना २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आग लागली़ केमीकलमध्ये निर्माण झालेल्या अति उष्णतेमुळे ही आग लागली़ टाकीतून आग बाहेर पडत असल्याचे कर्मचाºयांच्या लक्षात आले़ त्यानंतर सायरन वाजवून इतर कर्मचाºयांना सतर्क करीत गंगाखेड नगरपालिकेच्या अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले़ रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते़ आगीमध्ये मोठ्या प्रमाणात मॉलेसेस जळाल्याने ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे़ आग लागल्याची माहिती वेळीच मिळाल्याने जीवित हानी झाली नाही़ कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे, सोमाप्पा, बालासाहेब लोहार, दत्तात्रय गायकवाड, उल्हास पाटील, धपाट, सुरक्षा अधिकारी खान, घुले आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले़ घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगरे यांनीही फौजफाट्यासह घटनास्थळाकडे धाव घेतली़