शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

परभणी : रेशीम शेतीच्या चारशे प्रस्तावांना मिळेना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:37 IST

पारंपरिक शेतीत उत्पन्न मिळत नसल्याने जिल्ह्यात रेशीम योजनेअंतर्गत तुती लागवडीला चालना मिळत असतानाच शेतकऱ्यांना प्रशासकीय उदासिनतेचा फटका सहन करावा लागत आहे. प्रशासनातील दफ्तर दिरंगाईमुळे नोंदणीनंतरही चारशे लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत. जिल्हा रेशीम उद्योग केंद्रातील मनुष्यबळाचा अभाव रेशीम उत्पादकांच्या पथ्थ्यावर पडत असून, जिल्हा प्रशासनानेच आता या कामी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

विठ्ठल भिसे।लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी  (परभणी) : पारंपरिक शेतीत उत्पन्न मिळत नसल्याने जिल्ह्यात रेशीम योजनेअंतर्गत तुती लागवडीला चालना मिळत असतानाच शेतकऱ्यांना प्रशासकीय उदासिनतेचा फटका सहन करावा लागत आहे. प्रशासनातील दफ्तर दिरंगाईमुळे नोंदणीनंतरही चारशे लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत. जिल्हा रेशीम उद्योग केंद्रातील मनुष्यबळाचा अभाव रेशीम उत्पादकांच्या पथ्थ्यावर पडत असून, जिल्हा प्रशासनानेच आता या कामी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.रेशीम उत्पादनासाठी मराठवाड्यात अनुकूल वातावरण असून, दर्जेदार कोष निर्मिती होत असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांचा कल रेशीम कोष उत्पादनाकडे वाढला आहे. तसेच सततचा दुष्काळ, अनियमित पाऊस आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पारंपरिक शेतीत शाश्वती राहिली नसल्याने रेशीम व्यवसायाचा विस्तार जिल्ह्यात वाढत आहे.केंद्र पुरस्कृत सीडीपी योजना बंद २०१५-१६ पासून झाली. त्यामुळे २०१७-१८ या वर्षापासून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत तुती लागवड आणि कीटक संगोपणगृहासाठी अनुदान योजना सुरू करण्यात आली.पहिल्याच वर्षी जिल्ह्याला २०० एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. शेतकºयांनी ३०० एकरवर तुती लागवड केली. २०१८-१९ या वषार्साठी शासनाने महारेशीम अभियान राबविले होते. जिल्हाभरात ७६८ एकर तुती लागवडीसाठी नोंदणी झाली. मात्र नोंदणीपैकी केवळ ३५० एकर तुती लागवडीसाठी कार्यारंभ आदेश मिळून कामे सुरू झाली आहेत.जिल्ह्यात रेशीमचा विस्तार झपाट्याने वाढत असतानाच शेतकºयांसमोर समस्याचा डोंगरही वाढत आहे. योजनेची अंमलबजावणी करणाºया जिल्हा रेशीम कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव असल्याने योजना राबविण्यास हे कार्यलय असमर्थ ठरू लागले आहे. तांत्रिक मान्यता देण्यासाठी नेमलेल्या तांत्रिक सेवा पुरवठादारांवर अतिरिक्त जबाबदारी दिल्याने तेही या योजनेकडे कानाडोळा करीत आहेत. गंभीर बाब म्हणजे, जिल्हा रेशीम कार्यालयात एम.बी. रेकॉर्डच्या मोजमाप पुस्तिकाही उपलब्ध नाहीत. त्यामुळे ज्यांनी रेशीम शेतीची कामे सुरू केली त्यांनाही केवळ प्रशासकीय उदासिनतेमुळे वेळेत अनुदान मिळत नाही. शेतकºयांना आर्थिक प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाला आहे. शेतकरी पुढाकार घेत असताना प्रशासनातील दफ्तरदिरंगाईमुळे उदासिनतेची कीड रेशीम शेतीही पोखरत असल्याचे दिसत आहे. रेशीम उद्योग योजना राबवित असताना त्यात येणाºया प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकाºयांनीच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्हा रेशीम अधिकाºयांसह अनेक पदे रिक्तपरभणी येथील कृषी विद्यापीठातील जिल्हा रेशीम कार्यालयातून ९ तालुक्याचा कारभार चालतो. या कार्यालयातील जिल्हा रेशीम अधिकारी हे प्रमुख पद रिक्त आहे. ९ तालुक्यांसाठी २ क्षेत्र सहायक आणि २ वरिष्ठ तांत्रिक अधिकारी कार्यरत आहेत.४तांत्रिक सेवा पुरवठादाराची (टीएसपी) ५ पदे असली तरी त्यांच्याकडे पंचायत समितीचा मूळ पदभार असून, रेशीमचा अतिरिक्त पदभार सोपविल्याने कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे कामांचे हजेरीपत्रक तसेच मूल्यांकन वेळेवर होत नाही.योजनेचे स्वरूपमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबवण्यात येते. तुती लागवड आणि कीटक संगोपणगृह बांधकामासाठी अल्पभूधारक शेतकºयांना त्यांच्याच शेतात एक एकर तुती लागवडीसाठी २ लाख ९५ हजार रुपये मनरेगातून देण्याची तरतूद आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी