शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

परभणी : सायबर ग्राम योजनेतील शाळा तपासणीची औपचारिकताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:02 IST

बहुक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने सुरु केलेल्या सायबर ग्राम योजनेंतर्गत मंजूर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यात येत नसल्याची बाब लेखापरिक्षणात समोर आली होती. त्यानंतर संबंधित शाळांची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करण्याचे प्रधान सचिवांनी आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार परभणीत घडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बहुक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने सुरु केलेल्या सायबर ग्राम योजनेंतर्गत मंजूर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यात येत नसल्याची बाब लेखापरिक्षणात समोर आली होती. त्यानंतर संबंधित शाळांची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करण्याचे प्रधान सचिवांनी आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार परभणीत घडला आहे.केंद्र शासनाने अल्पसंख्याक समाजातील सहावी ते दहावीचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना माहिती व संपर्क तंत्रज्ञानाचे मुलभूत कौशल्य प्राप्त व्हावे, या दृष्टीकोनातून डिजीटल साक्षर करण्यासाठी प्रात्याक्षिकाद्वारे संगणक प्रशिक्षण देण्यासाठी सायबर ग्राम योजना कार्यान्वित केली होती. या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी १ हजार ५५५ रुपये केंद्र शासनाने मंजूर केले होते आणि महाराष्ट्र शासनाने राज्यातील १४ जिल्ह्यातील गटांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी २ हजार रुपये मंजूर केले होते. यामध्ये परभणी शहरातील गटाचा समावेश होता. कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला ३९ तासांचे मुलभूत संगणक प्रशिक्षण देऊन हे प्रशिक्षण देऊन नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फॉरमेशन टेक्नॉलाजी किंवा नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ ओपन स्कुलिंग किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ किंवा इतर नॅशनल सर्टिफिकेशनद्वारे मुलभूत संगणक अभ्यासक्रमाची प्रमाणपत्र परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावयाची होती. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ४ कोटी ३५ लाख व दुसºया टप्प्यात २ कोटी १८ लाख रुपयांचा निधी दिला होता. या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केले गेले नाही. त्यानंतर या योजनेचे नागपूर येथील महालेखापालांकडून लेखापरिक्षण करण्यात आले. त्यामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. या योजनेंतर्गत राज्यातील २६ हजार ८६० नोंदणीकृत उमेदवारांपैकी डिसेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ पर्यंत १५ हजार ७९१ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले. ११ हजार ६९ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले नाही. ज्यांना प्रशिक्षण दिले, त्या विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र सीएससी ई-गर्व्हनन्स सर्व्हिस इंडिया लि.कडून घेतले गेले नाही. या योजनेअंतर्गत सूनिश्चित केलेल्या शाळांची तपासणी केली गेली नाही. त्यामुळे संबंधित शाळांची तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश एप्रिल २०१८ मध्ये देण्यात आले होते. नोव्हेंबर २०१८ पर्यंत अहवाल सादर केले नाहीत, असेही लेखापरिक्षणात म्हटले आहे.या शाळांचे होते अहवालमंडळ अधिकारी व लिपिकांनी शहरातील मॉडेल उर्दू हायस्कूल, मोईदुल मुस्लीमीन हायस्कूल, सेंट आॅगस्टीन इंग्लिश स्कूल, डॉ.जाकीर हुसैन हायस्कूल, बालविद्यामंदिर, मुंजाजी विठ्ठल शिंदे विद्यालय, अंजुमन उर्दू हायस्कूल व इकरा इर्दू हायस्कूल या शाळांची तपासणी केली असता येथे तपासणीच्या वेळी प्रशिक्षण बंद असल्याचे अहवालात नमूद केले आहे. या शाळांनी पूर्वीच प्रशिक्षण दिल्याचे सांगण्यात आले.परभणी शहरातील ९ शाळांची झाली होती निवडसायबर ग्राम योजनेंतर्गत परभणी शहरातील ९ शाळांची निवड करण्यात आली होती. महालेखापालांच्या लेखापरिक्षणात योजनेच्या अंमलबजावणी बाबत ताशेरे ओढण्यात आल्यानंतर राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव शाम तांगडे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या शाळांची तपासणी करण्यासाठी गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांची नियुक्ती करावी व या संदर्भातील अहवाल सादर करावा, असे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी परभणी तहसीलदार व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना या संदर्भात तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या अधिकाºयांनी स्वत: तपासणी न करता मंडळ अधिकारी व लिपिकांना तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या कर्मचाºयांनी दिलेला अहवाल अत्यंत तकलादू व एका जागेवर बसून तयार केल्याचेच दिसून येत आहे. अहवालावर विद्यार्थ्यांच्या नावानी स्वाक्षरी व मत शिक्षकांनीच नोंदविले आहेत. शिवाय काही शाळांची माहिती मोघम स्वरुपात आहे. सरस्वती विद्यालय या एकाच शाळेने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले नसल्याची कबुली दिली आहे.विचारली एक आणि दिली दुसरीच माहिती...शाळा तपासणीसाठी ठरवून दिलेल्या पत्र नमुन्यात बालविद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापकांनी एक माहिती विचारली असता दुसरीच माहिती नोंदविली आहे. शाळेतील संबंधित विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण दिले आहे का? असा सवाल केला असता शाळेत सुसज्ज प्रशिक्षण प्रयोगशाळा आहे, असे नमूद केले आहे. किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले, याचा रकाना कोराच सोडण्यात आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीSchoolशाळा