परभणी : पोखर्णीत लागली दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:18 IST2018-01-24T00:18:12+5:302018-01-24T00:18:26+5:30

येथील एका टेलरिंगच्या दुकानाला आग लागून कपड्यांसह इतर साहित्य जळाल्याची घटना २३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली़ परभणी तालुक्यातील पोखर्णी फाटा येथे व्यंकटेश माणिकराव आव्हाड यांचे टेलरिंगचे दुकान आहे़

Parbhani: Fire at the shop at the Pokhni | परभणी : पोखर्णीत लागली दुकानाला आग

परभणी : पोखर्णीत लागली दुकानाला आग

लोकमत न्यूज नेटवर्क
पोखर्णी : येथील एका टेलरिंगच्या दुकानाला आग लागून कपड्यांसह इतर साहित्य जळाल्याची घटना २३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली़
परभणी तालुक्यातील पोखर्णी फाटा येथे व्यंकटेश माणिकराव आव्हाड यांचे टेलरिंगचे दुकान आहे़ २३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता व्यंकटेश आव्हाड यांच्या कारागिराने दुकान उघडले असता, दुकानाला आग लागल्याचे लक्षात आले़ ही माहिती व्यंकटेश आव्हाड यांना देण्यात आली़ त्यांनी पाहणी केली असता, दुकानातील शिवलेले कपडे, टेबल, खुर्ची आदी साहित्य जळालेले दिसले़ दुकानाच्या पाठीमागून येऊन कोणी तरी आग लावल्याचे व्यंकटेश आव्हाड यांनी पोलिसांना सांगितले़ व्यंकटेश आव्हाड यांनी दैठणा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली असून, पोलीस कर्मचारी एस़जी़ बडे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली़ यावेळी दुकानातील बोर्ड जळालेला दिसला असून, शॉटसर्किटने आग लागल्याचे सध्या तरी दिसून येत असल्याचे एस.जी. बडे यांनी सांगितले. दरम्यान या संदर्भात दैठणा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

Web Title: Parbhani: Fire at the shop at the Pokhni