परभणी : सिंगणापूर ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:25 IST2018-01-25T00:21:09+5:302018-01-25T00:25:14+5:30
तालुक्यातील आमडापूर येथील गट नंबर २८५ व २८६ यामधून शेत रस्ता देण्याच्या मागणीसाठी सिंगणापूर येथील ग्रामस्थ १८ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत़

परभणी : सिंगणापूर ग्रामस्थांचे उपोषण
परभणी- तालुक्यातील आमडापूर येथील गट नंबर २८५ व २८६ यामधून शेत रस्ता देण्याच्या मागणीसाठी सिंगणापूर येथील ग्रामस्थ १८ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत़
आमडापूर शिवारातील गट नंबर २८८ मध्ये जाण्यासाठी गट नंबर २८५ व २८६ या नंबरच्या धुºयामधून शेत रस्ता होता़ परंतु, गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता बंद करण्यात आला आहे़ त्यामुळे गट नंबर २८८ मध्ये ये-जा करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ या बाबत तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी रस्ता करून दिला होता़ मात्र तोही आता रस्ता आडविला आहे़ त्यामुळे याकडे जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन हा रस्ता मोकळा करून द्यावा, या मागणीसाठी सिंगणापूरचे ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत़ यामध्ये विठ्ठल खिल्लारे, सदाशिव खिल्लारे, श्रीरंग खिल्लारे, गोविंद खिल्लारे, गणेश खिल्लारे आदींचा समावेश आहे.