शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

परभणी : उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:44 PM

सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांना सरासरी १४ हजार रुपयांचा खर्च झाला असून, त्या तुलनेत प्रति एकरी १८ हजार रुपयांचे उत्पादन होत असल्याने शेतकºयांना केवळ ४ ते ५ हजार रुपये हातात पडत आहेत. पेरणीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पादन निघत नसल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे़

सत्यशील धबडगे ।लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांना सरासरी १४ हजार रुपयांचा खर्च झाला असून, त्या तुलनेत प्रति एकरी १८ हजार रुपयांचे उत्पादन होत असल्याने शेतकºयांना केवळ ४ ते ५ हजार रुपये हातात पडत आहेत. पेरणीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पादन निघत नसल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे़मानवत तालुक्यातील शेतशिवारात सध्या सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे़ दसरा सणाच्या आगोदर सोयाबीनची काढणी करून त्याच शेतात रबी हंगामातील पेरणीसाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे़ मात्र मजुरांची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत असल्याने शेती करताना अडचणी निर्माण होत आहेत़ सोयाबीन काढणीसाठी एकरी १५ हजार रुपयाचा खर्च येत आहे़ दुसरीकडे शासनाकडून शेतकºयांना हमीभावाची शाश्वती दिली जात असली तरी प्रत्यक्षात खरेदी केंद्रावर खरेदी करताना अनेक अटी निकषाचे ओझे शेतकºयांच्या खांद्यावर टाकले जात आहे़ आपला माल विक्री केल्यानंतरही चुकाºयासाठी तीन-तीन महिने शेतकºयांना ताटकळत रहावे लागत असल्याचा अनुभव शेतकºयांच्या पाठीशी आहे़ एकीकडे जाचक अटींची पूर्तता करून नाकी नऊ आलेल्या शेतकºयांना नाफेडची खरेदी सुरू न झाल्याने खाजगी व्यापाºयांकडे मिळेल त्या भावात आपला माल विक्री करून मोकळे व्हावे लागत आहे़ यामुळे शेतकºयांची अवस्था मागे आड पुढे विहीर अशी झाली आहे़ अनेक शेतकºयांनीशासनाच्या जाचक अटींमध्ये अडकायला नको म्हणून खाजगी व्यापाºयांकडे आपला माल खाली केला आहे़ दहा वर्षांपासूनाचा शेती व्यवसाय आणि त्यापासून निघणाºया उत्पादनाची तुलना केल्यास शेती सर्वात तोट्याचा व्यवसाय ठरत आहे़ शेतीसाठी लागणारी अवजारे, निविष्ठा यांचा खर्च दुप्पटीने वाढत असून, शेतीमालाचा भाव घटला आहे़ तालुक्यातील सोयाबीन उत्पादनाचा विचार केल्यास शेतकºयांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे़एक हजार शेतकºयांची : आॅनलाईन नोंदणीराज्य शासनाने सोयाबीनला हमीभाव ३ हजार ३९९ रुपये जाहीर केला आहे़ हमीभाव केंद्रावर माल विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी सुरू केली, असून, नोंदणीचा एक हजाराचा आकडा पार झाला आहे़ मात्र प्रत्यक्षात या केंद्रावर खरेदी कधी सुरू होणार याची शाश्वती नसल्याने गरजेपोटी शेतकºयांना मिळेल त्या दराने खाजगी व्यापाºयांना सोयाबीन विक्री करण्याची वेळ आली आहे़२००८ च्या तुलनेत सध्या सोयाबीन उत्पादनासाठी चौपट खर्च येत आहे़ उत्पन्न निम्म्यावर आले आहे़ शेतकºयांना आर्थिक फटका बसू नये म्हणून हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकºयांतून केली जात आहे़दहा वर्षांतील सोयाबीनच्या भावातील फरकवर्ष हमीभाव प्रत्यक्ष बाजार भाव२००८-०९ १३९० १८०० ते २६००२००९-१० १३१० २००० ते २७००२०१०-११ १४४० २१०० ते २८००२०११-१२ १६९० २४०० ते ५०००२०१२-१३ २२४० २३०० ते २५००२०१३-१४ २५६० २४५० ते ३७००२०१४-१५ २५६० २४०० ते ३३००२०१५-१६ २६०० १८०० ते २८०००२०१६-१७ २७७५ १६०० ते २५००२०१७-१८ ३०५० १६०० ते २५००२०१८-१९ ३३९९ २७०० ते ३०००एकरी सोयाबीन उत्पादनासाठी येणारा खर्चशेती कामे वर्ष २००८ वर्ष २०१८नांगरणी २५० रु़ १५०० रु़रोटावेटर -- ३००बियाणे ६०० २२००पेरणी १०० १६००बीज प्रक्रिया ़़़़ ६००तननाशक १००० २५००बुरशीनाशक ४०० १०००फवारणी १०० ८००कापणी ५०० २०००काढणी ६० १२००मजुरी १०० ७००एकूण ३५६० १४४००

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणीRainपाऊस