शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शेतकरी जनजागृतीला कृषी विभागाचा ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:34 IST

राज्य शासनाचे आदेश असतानाही जिल्ह्यात फवारणी करताना घ्यावयाच्या काळजी बाबत प्रभावी जनजागृती होत नसल्याने शेतकऱ्यांंमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे़ केवळ खाजगी कंपनी नेमून कृषी विभागाने हात वर केल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाचे आदेश असतानाही जिल्ह्यात फवारणी करताना घ्यावयाच्या काळजी बाबत प्रभावी जनजागृती होत नसल्याने शेतकऱ्यांंमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे़ केवळ खाजगी कंपनी नेमून कृषी विभागाने हात वर केल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़दोन वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना शेतकºयांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरू झाले होते़ फवारणीची तंत्रशुद्ध मााहिती नसल्याने शेतकºयांना या संकटाला सामोरे जावे लागले़ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य शासनाने स्वतंत्र अध्यादेश काढून कृषी विभागातील अधिकाºयांनी गावा-गावांत जाऊन फवारणी कशी करावी आणि फवारणी करताना काय काळजी घ्यावी, या बाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले होते़ मात्र दोन वर्षांपासून कृषी विभागाने या संदर्भात गांभिर्याने घेतले नाही़ जनजागृतीकडे पाठ फिरविली़ दोन दिवसांपूर्वी जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे एका शेतकºयाचा फवारणी करताना विषबाधा होवून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़त्यामुळे आता कृषी विभागाच्या जनजागृतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ या संदर्भात कृषी विभागातील अधिकाºयांनी मागील १५ दिवसांपासून प्रत्यक्षात जनजागृतीला सुरुवात केली असली तरी हे अधिकारी किती गावांपर्यंत पोहोचले, हाही प्रश्न आहे़ विशेष म्हणजे, ज्या गावात फवारणी करताना शेतकºयाचा मृत्यू झाला़ त्या गावात जनजागृती संदर्भात विचारणा केली असता, कृषी विभागातील अधिकारी आले नसल्याची माहिती मिळाली आहे़ जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ पावसाने ताण दिला असून, ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने पिके प्रादुर्भावग्रस्त होत आहेत़ या पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत आहेत़ जसा प्रादुर्भाव वाढला तसे फवारणीचे प्रमाणही वाढले आहे़ विशेष म्हणजे, फवारणीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि आता कुठे कृषी विभागाने जनजागृतीला सुरुवात केली आहे़ केवळ कागदोपत्री मेळावे घेऊन चार-दोन गावांत जनजागृती केली जात आहे़ जिल्ह्यामध्ये ८४८ गावे असून, या पैकी किती गावांमध्ये कृषी विभाग पोहोचला, हा संशोधनाचा विषय आहे़ दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने जनजागृती संदर्भात अध्यादेश दिले असले तरी प्रत्यक्षात जनजागृती होत नाही़ क्रॉपसॅप या कार्यक्रमांतर्गत कृषी विभागातील अधिकारी शेतकºयांना माहिती देतात? असे सांगितले जाते; परंतु, फवारणी सुरू होण्यापूर्वीच शेतकºयांची जनजागृती करणे आवश्यक होते़ या जनजागृतीला खो दिल्यामुळे अजूनही शेतकरी पारंपारिक पद्धतीने फवारणी करतात आणि त्याचा फटका शेतकºयांना सहन करावा लागतो़ दोन दिवसांपूर्वी कौसडी येथे तर एका शेतकºयाला आपला जीव गमवावा लागला़ त्यामुळे कृषी विभागाच्या जनजागृती मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़खाजगी कंपनीमार्फत जनजागृती४जिल्ह्यातील शेतकºयांना फवारणीची माहिती देण्यासाठी गोदरेज अ‍ॅग्रीवेट कंपनी या खाजगी कंपनीची निवड करण्यात आली आहे़ या कंपनीच्या माध्यमातून फवारणी संदर्भातील माहिती शेतकºयांना दिली जात आहे़ ही कंपनी जनजागृतीसाठी नियुक्त केली असली तरी कंपनीकडे जनजागृतीसाठी पुरेसे मनुष्यबळ नाही़ एकच चित्ररथ तयार करण्यात आला असून, तो संपूर्ण जिल्हाभरात फिरविला जात आहे़४त्यामुळे हा चित्ररथ किती गावांपर्यंत पोहचेल असा प्रश्न निर्माण होत आहे़ शिवाय चार-पाच कर्मचाºयांच्या सहाय्याने संपर्ण शेतकºयांपर्यंत फवारणीची शास्त्रोक्त माहिती पोहचेल का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे़ एकंदर खाजगी कंपनी आणि कृषी विभागातील अधिकारी यांच्याकडून फवारणीसाठी गांभिर्याने प्रयत्न होत नसल्याने शेतकºयांपुढे असुरक्षितता निर्माण झाली आहे़घटनेनंतर दाखल झाले अधिकारी४जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील एका शेतकºयाचा कीटकनाशक फवारताना ते अंगावर उडाल्याने विषबाधा होऊन मृत्यू झाला़४ही घटना घडल्यानंतर कृषी विभागातील अधिकाºयांना जाग आली. घटनेनंतर जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकाºयांनी कौसडी येथे भेट देऊन माहिती घेतली.४कृषी विभागातील अधिकाºयांनी यापूर्वीच कौसडी येथे जनजागृती केली असती तर कदाचित शेतकºयाला जिव गमवावा लागला नसता.परवानगी नसलेली औषधी बाजारात विक्रीलाखरीप हंगामातील पिकांना कीड व रोगापासून मुक्त करण्यासाठी शेतकºयांकडून कीटकनाशकांची फवारणी केली जाते़ त्यासाठी हे औषध कसे हताळायचे यावर कृषी विभागाकडून शेतकºयांची जनजागृती करण्यात येते; परंतु, तसे होताना मात्र दिसून येत नाही़विशेष म्हणजे ज्या औषधांना विक्री करण्यासाठी परवानगी नाही, ती औषधी सुद्धा बाजारातून सर्रासपणे विक्री केली जात आहेत़ कृषी विभाग मात्र बघ्याची भूमिका घेऊन एकप्रकारे ही औषधी विक्री करण्यास सहमती देतो की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे़त्या कारखान्यावरील कारवाई गुलदस्त्यातदोन वर्षापूर्वी परभणी शहरातील खानापूर फाटा परिसरात पोलीस प्रशासन व कृषी विभागाने बनावट खत व औषधींचा कारखाना उघडकीस आणला होता़ त्यावर मोठी कारवाई होईल, अशी अपेक्षा शेतकºयांची होती़ परंतु, दोन वर्षे उलटले तरीही या कारवाईत काय झाले? याबाबत अद्यापही स्पष्टता दिसून येत नाही़गोदरेज अ‍ॅग्रीवेट कंपनीने परभणी जिल्ह्यात परभणी, जिंतूर, गंगाखेड आणि मानवत येथे कर्मचारी नियुक्त केले आहेत़ हे कर्मचारी गावा-गावांत जाऊन शेतकºयांना फवारणीची माहिती देतात़ जुलै महिन्यापासून जनजागृतीला सुरुवात केली असून, आतापर्यंत ६० ते ७० गावांत जनजागृती झाली आहे़ २१ आॅगस्टपासून फवारणीची माहिती देणारा चित्ररथ फिरविला जात आहे़ जिंतूर, परभणी, गंगाखेड तालुक्यात हा चित्ररथ फिरविला जाणार आहे़-अक्षय येवारे, जिल्हा व्यवस्थापक, गोदरेज अ‍ॅग्रीवेट कंपनी

टॅग्स :parabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी