शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाण्याअभावी वृक्ष लागवड मोहिमेला बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:51 IST

वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्यात वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेली बहुतांश झाडे पाण्याअभावी जाग्यावरच करपून गेल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्यात वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेली बहुतांश झाडे पाण्याअभावी जाग्यावरच करपून गेल्याचे दिसून येत आहे.राज्य शासन गेल्या तीन वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम योजना राबवित आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात यावर्षीच्या जून महिन्यात ३४ लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे जून व जुलै या दोन महिन्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने लावण्यात आलेल्या झाडांची वाढही समाधानकारक होती; परंतु, त्यानंतर आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांत जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. त्यामुळे या वृक्षांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे या झाडांची वाढ खुंटली.सध्या तर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या झाडांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास २२ विभागांनी लावलेल्या ३४ लाख झाडांपैकी बहुतांश रोपटे जळून गेली आहेत.शाश्वत पाणीपुरवठ्याची गरज४ राज्य शासन दरवर्षी वेगवेगळ्या योजना राबवून वृक्ष लागवड करीत आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाला उद्दिष्ट देण्यात येते; परंतु, एकदा वृक्ष लागवड केल्यानंतर त्या वृक्षाला पाणीपुरवठा केला जात नाही, तशी तरदूतही या योजनेत नाही. त्यामुळे वृक्ष लागवड मोहिमेतील झाडे जगविण्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळ