शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

परभणी : ३६ हजार मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:28 AM

रोजगार हमी योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्यात कामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, जिल्हाभरात १ हजार ७५ कामांवर ३६ हजार ४५० मजुरांना रोजगार मिळाला आहे़ एकंदर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि मजुरांचे स्थलांतर लक्षात घेता अजूनही रोहयोकडे कामे मागणाऱ्या मजुरांचा ओढा कमी असल्याचे दिसत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रोजगार हमी योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्यात कामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, जिल्हाभरात १ हजार ७५ कामांवर ३६ हजार ४५० मजुरांना रोजगार मिळाला आहे़ एकंदर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि मजुरांचे स्थलांतर लक्षात घेता अजूनही रोहयोकडे कामे मागणाऱ्या मजुरांचा ओढा कमी असल्याचे दिसत आहे़जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापासून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ राज्य शासनाने जिल्ह्यात पूर्णा तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, या तालुक्यात दुष्काळ निवारणाची कामे प्राधान्याने करणे अपेक्षित आहे़ दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसाय कोलमडला असून, शेतशिवारांमध्ये कामे शिल्लक नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतीवर अवलंबून असणाºया मजुरांनाही कामाच्या शोधात भटकंती करावी लागत आहे़ अशा परिस्थितीमध्ये या मजुरांना त्यांच्या गावातच काम उपलब्ध व्हावे, या उद्देशाने रोजगार हमी योजना राबविली जाते़ ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून कामे उपलब्ध करून दिली जातात़ मजुरांनी कामाची मागणी करताच त्यांना काम उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य या विभागाचे आहे; परंतु, जानेवारी महिन्यापर्यंत रोजगार हमी योजनेकडे काम मागण्यासाठी मजूर फिरकत नसल्याने परिस्थिती आणखीच गंभीर झाली होती़ ग्रामीण भागातून शहरी भागात आणि पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्येही मजुरांचे स्थलांतर वाढले होते़ ग्रामीण भागातील हे मजूर पर जिल्ह्यात कामासाठी जात असले तरी स्थानिक पातळीवर मात्र रोहयोकडे काम मागितले जात नव्हते़ त्यामुळे या योजनेतील त्रुटी शोधण्याची वेळ प्रशासनावर आली होती़मागील दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने रोहयोच्या कामावर लक्ष केंद्रीत केले असून, कामांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ ६ ते १४ फेब्रुवारी या आठवड्यामध्ये जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची ८६५ कामे सुरू होती़या कामांवर २९ हजार १६९ मजूर काम करीत होते़ त्या पुढील आठवड्यात कामांची संख्या वाढली आहे़ १४ ते २० फेब्रुवारी या काळात १ हजार ७५ कामे सुरू असून, ३६ हजार ४५० मजुरांना रोजगार हमी योजनेंतर्गत काम उपलब्ध झाले आहे़ त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ८५८ कामे सुरू असून, ३१ हजार ३३२ मजुरांना काम मिळाले तर विविध शासकीय यंत्रणांची २१७ कामे सुरू असून, त्यावर ५ हजार ११८ मजूर काम करीत आहेत़ एकंदर फेबु्रवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रोजगार हमी योजनेकडे मजुरांचा ओढा अल्पशा प्रमाणात सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे; परंतु, जिल्ह्यातील एकंदर दुष्काळाची परिस्थिती, रोजगाराची समस्या लक्षात घेता अजूनही मजुरांचा कल रोहयोकडे वाढत नसल्याचेच दिसत आहे़गंगाखेड तालुक्यात वाढली कामेरोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात कामे घेतली जात आहेत़ त्यात गंगाखेड तालुक्याने मोठी आघाडी घेतली आहे़ ६ ते १४ फेब्रुवारी या आठवड्यात गंगाखेड तालुक्यात केवळ ७ कामे सुरू होती़ या कामांवर ३२१ मजूर काम करीत होते़ तर १४ ते २० फेब्रुवारी या आठवड्यात गंगाखेड तालुक्यात ११० कामे सुरू झाली असून, २ हजार ९३४ मजुरांना काम उपलब्ध झाले आहे़ पाथरी तालुक्यात मागील आठवड्यात केवळ १२ कामे सुरू होती़ चालू आठवड्यामध्ये या तालुक्यात ३२ कामे सुरू झाली असून, ३१५ मजुरांना काम उपलब्ध झाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळ