परभणी : महावितरणसमोर कर्मचाऱ्यांची द्वारसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:14 AM2018-09-27T00:14:35+5:302018-09-27T00:15:31+5:30
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी येथे महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी येथे महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली़
पदोन्नती पॅनलवर राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांना घेण्यात यावे, शिकाऊ उमेदवारांच्या भरतीला जाणून बुजून वेळ लावू नये, जादा कामाची देयके अदा करावीत, विद्युत सहाय्यकांना इतरत्र पदस्थापना द्याव्यात, यासह अन्य विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी दुपारी १़३० च्या सुमारास मंडळ कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली़ यावेळी उपस्थित पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले़ तसेच प्रभारी व्यवस्थापकांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली़ यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबुराव तोटेवाड, झोन उपाध्यक्ष आऱपी़ घोडगे, कार्याध्यक्ष पी़बी़ भडंगे, सचिव एस़टी़ पारवे, उपाध्यक्ष महेश बोलेवार, यु़आऱ जमदाडे, बी़एम़ धोत्रे, रमेश वंगल, प्रदीप जुकटे, शिवाजी चव्हाण, उपेंद्र धकाते, भूषण कसबे, पी़ए़ पाटील, आऱ एस़ मुळे, बाबासिंग बायस, सी़एस़ मुंडे, एम़वाय़ गायकवाड, दीपक शेंडगे, व्ही़ बी़ शहाणे, एम़एम़ घोबाळे, संदीप चिमलवाड, अश्विनी भदर्गे, अश्विनी सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती़