शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
4
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
5
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
6
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
7
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
8
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
9
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
10
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
11
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
12
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
13
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
14
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
15
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
16
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
17
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
18
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
19
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!
20
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार

परभणी : कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:28 AM

तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत मोठ्या कष्टाने कापसाचे पीक घेतले. मात्र वेचणीसाठी मजूर अव्वाच्या सव्वा दराने मजुरी मागत असल्याने कापूस घरी आणायचा कसा? असा प्रश्न पडला आहे. परतीचा पावसाने आर्थिक फटका बसलेल्या शेतकºयांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत मोठ्या कष्टाने कापसाचे पीक घेतले. मात्र वेचणीसाठी मजूर अव्वाच्या सव्वा दराने मजुरी मागत असल्याने कापूस घरी आणायचा कसा? असा प्रश्न पडला आहे. परतीचा पावसाने आर्थिक फटका बसलेल्या शेतकºयांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.तालुक्यातील शेतकरी कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसावर शेतकºयांनी आर्थिक भार सहन करीत कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत पिकाला खत, फवारणी, निगराणी केल्याने पिकेही जोमदार वाढली; परंतु, कापसाचे पीक हातात यायच्या वेळेसच परतीच्या पावसाने तालुक्यात हजेरी लावली आणि होत्याचे नव्हते झाले. परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला. पावसाने नुकसान झाल्याने फुटलेल्या कापसाचे तीन तेरा वाजले. ज्या शेतकºयांच्या शेतात कापूस वेचणी बाकी आहे, ते शेतकरी मजुरांअभावी त्रस्त झाले आहेत. यंदा मजुरीने शेतकºयांचे कंबरडे मोडले असून सव्वाशे रुपये असलेला मजुरीचा दर दोनशे रुपयांवर गेला आहे. ७ ते १० रुपयाने किलोने कापसाची वेचणी केली जात आहे. परिणामी उत्पादनापेक्षा उत्पादन खर्चच अधिक होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकºयांना वेचणीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. मजुरांना शेतात ने -आण करण्यासाठी शेतकºयाला वाहनांची व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. ज्या शेतकºयांनी वेचणी पूर्ण करुन माल बाजारात विक्रीसाठी आणला आहे, त्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकºयांची कोंडी झाली आहे. एकूणच यंदा कापूस उत्पादक शेतकºयांचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे चित्र तालुक्यासह परिसरात दिसून येत आहे.खर्च, उत्पादनाची: गोळाबेरीज जुळेना४कापसाच्या पिकाला केलेला खर्च व त्यातून मिळणाºया उत्पन्नाचा ताळमेळ बसविणे अवघड झाले आहे. झालेल्या खर्चा एवढे उत्पादन मिळण्याची शक्यता कमी आहे. पाऊस, मजुरीचे वाढलेले दर व मिळत असलेला कमी भाव या तिहेरी संकटाने शेतकºयांना आर्थिक गणित जुळविणे अवघड झाले आहे.४कापूस उत्पादक शेतकºयांची अवस्था पाहाता त्याच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या कापूस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्यसरकाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.सोयाबीनची आवक घटली४या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात सर्वच मालाची आवक घटली आहे.४ विशेषत: सोयाबीनची आवक गतवर्षी आॅक्टोबर अखेर ३० हजार क्विंटल झाली होती. या वर्षी यामध्ये घट झाली असून ११ नोव्हेंबरपर्यंत १९ हजार क्विंटल आवक बाजार समितीच्या यार्डात झाली आहे. या आकड्यावरुन आवक घटल्याचे दिसून येत आहे.२३ हजार हेक्टरवर कापूस४तालुक्यात एकूण ४२ हजार २१० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्यात आली आहे. यात सर्वाधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात असून एकूण २३ हजार ७३३ हेक्टरवर लागवड करण्यात आली. त्या खालोखाल १२ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूसRainपाऊस