परभणी : दसरा उत्सवास आनंदाचे उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 23:45 IST2019-10-08T23:45:11+5:302019-10-08T23:45:38+5:30
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा मंगळवारी शमी पूजन, सीमोल्लंघन, अपराजिता पूजन आणि शस्त्र पूजनाने जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात आला.

परभणी : दसरा उत्सवास आनंदाचे उधाण
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा मंगळवारी शमी पूजन, सीमोल्लंघन, अपराजिता पूजन आणि शस्त्र पूजनाने जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात आला.
आदिशक्ती जगदंबेच्या नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाची सांगता मंगळवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर झाली. सकाळी घरोघरी घटोत्थापन करण्यात आले. महापूजा, नैवेद्य दाखविणे आणि परडी भरण्यास गृहिणींची लगबग दिसून आली. घरोघरी झेंडूच्या फुलांचे हार आणि आंब्यांच्या पानांचे तोरण लावण्यात आले होते. सायंकाळी शमी पूजन, अपराजिता पूजन, शस्त्रपूजन आणि सीमोल्लंघन करण्यात आले. यानिमित्त शहरातील जिल्हा स्टेडियम परिसरात शमी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना दसºयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस दलातील शस्त्रांचे पूजन करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
दरम्यान, दसºयाच्या मुहूर्तावर सोने खरेदीही चांगल्या प्रमाणात झाली. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, वाहनांची खरेदीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. नोंदणीसाठी आवश्यक असलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मात्र बंद होते.