परभणी जिल्हा कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:50 IST2017-12-18T00:50:03+5:302017-12-18T00:50:24+5:30
जिल्ह्यातील शेतकºयांच्या प्रश्नावर १९ रोजी काढला जाणारा मोर्चा हाणून पाडण्यासाठी सरकारच्या दबावातून पोलीस प्रशासन शिवसैनिकांना नोटिसा पाठवत आहे. मात्र या नोटिसांना न घाबरता शेतकरी व शिवसैनिकांनी स्वाभिमानाने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले आहे.

परभणी जिल्हा कचेरीवर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील शेतकºयांच्या प्रश्नावर १९ रोजी काढला जाणारा मोर्चा हाणून पाडण्यासाठी सरकारच्या दबावातून पोलीस प्रशासन शिवसैनिकांना नोटिसा पाठवत आहे. मात्र या नोटिसांना न घाबरता शेतकरी व शिवसैनिकांनी स्वाभिमानाने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले आहे.
पोलीस प्रशासनाने शिवसैनिकांना पाठविलेल्या नोटिसांच्या अनुषंगाने 'लोकमत'शी बोलताना खा. जाधव म्हणाले की, जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून शेतकºयांची अडवणूक केली जात आहे. नऊ वर्षात पहिल्यांदाच धरणात मूबलक पाणीसाठा असतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने खरीपापाठोपाठ रब्बी हंगाम देखील हातचा जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. महावितरणने साडेचार हजार कृषी पंपाचे नवीन वीज कनेक्शन दिलेले नाही. महावितरणच्या अडवणुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला असून शेतकºयांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे.
मात्र सरकारच्या दबावापोटी पोलीस प्रशासन शिवसैनिकांना नोटिसा पाठवून भीती निर्माण केली जात आहे. त्यामुळे आपण सदैव शेतकºयांच्या पाठिशी उभे असून कोणीही घाबरु नये, मी स्वत: सर्वांच्या पुढे असेल, तेव्हा शेतकºयांनी नोटिसांना न घाबरता स्वाभिमानाने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले आहे.