परभणी : जिल्हाधिकाऱ्यांचे अरबूजवाडीत श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:53 IST2019-05-05T23:53:21+5:302019-05-05T23:53:36+5:30
पाणी फाऊंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धे दरम्यान, ५ मे रोजी गंगाखेड तालुक्यातील अरबूजवाडी येथे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी महाश्रमदानात सहभाग नोंदवित श्रमदान केले़

परभणी : जिल्हाधिकाऱ्यांचे अरबूजवाडीत श्रमदान
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पाणी फाऊंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धे दरम्यान, ५ मे रोजी गंगाखेड तालुक्यातील अरबूजवाडी येथे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी महाश्रमदानात सहभाग नोंदवित श्रमदान केले़
गंगाखेड तालुक्यातील अरबूजवाडी, सुप्पा जहांगीर, सुप्पा खालसा या गावांना रविवारी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर व सीईओ पृथ्वीराज यांनी भेट दिली़ अरबूजवाडी येथे श्रमदान केल्यानंतर जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी जलसंवर्धनासंदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले़ रिलायन्स फाऊंडेशनने या गावासाठी पोकलेन मशीन दिली असून, शिवशंकर यांच्या हस्ते या मशीनद्वारे कामास प्रारंभ करण्यात आला़
गावातील शोष खड्ड्यांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली़ तसेच सुप्पा येथील सलग समतलचर कामाची पाहणीही त्यांनी केली़ सुप्पा खालसा येथील माती नाला बांधाचे भूमिपूजन शिवशंकर यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी उपविभागीय अधिकारी कमलाकर फड, तहसीलदार स्वरुप कंकाळ, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर आदींची उपस्थिती होती़