शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:35 AM

परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे दोन तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली असून इतर तालुके या सरासरीच्या जवळ पोहचत आहेत. परिणामी जिल्ह्यातील संभाव्य टंचाईचे संकट काही काळापुरते पुढे ढकलले गेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे दोन तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली असून इतर तालुके या सरासरीच्या जवळ पोहचत आहेत. परिणामी जिल्ह्यातील संभाव्य टंचाईचे संकट काही काळापुरते पुढे ढकलले गेले आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये खंड घेत पाऊस झाला. हा पाऊस प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात मात्र झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांना तारले असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम होता. मान्सूनचा पाऊस साधारणत: एक महिना उशिराने जिल्ह्यात दाखल झाला आणि एक महिना उशिरानेच परतीला निघाला आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्याच्या तिसºया आठवड्यात यावर्षी पाऊस होत आहे. परभणी जिल्ह्यात सरासरी ७७४ मि.मी.पाऊस होतो. यावर्षी आतापर्यंत ६६२.९८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या ८५ टक्के पाऊस झाला असून अजून १५ टक्के पावसाची तूट आहे.दरम्यान, दोन दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस होत आहे. शनिवारी सेलू आणि पाथरी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यानंतर रविवारीही हा पाऊस जिल्ह्यात बरसला. पालम तालुक्यात सर्वाधिक ४८ मि.मी. पाऊस झाला आहे. तर परभणी १०.७६, पूर्णा ३५.२०, गंगाखेड २६.५०, सोनपेठ ३४, सेलू ४.८०, पाथरी १३.३३, जिंतूर ०.५० आणि मानवत तालुक्यात ७.६७ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्हाभरात सरासरी २०.०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.परभणी तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ६२ टक्के पाऊस या तालुक्यात नोंद झाला आहे. तर जिंतूर तालुक्यातही केवळ ६५ टक्के पाऊस आतापर्यंत बरसला. पालम तालुक्याची वार्षिक सरासरी ६९७ मि.मी. असून या तालुक्यात आतापर्यत ७३२.३५ मि.मी. पाऊस झाला. सरासरीच्या १०५ टक्के पाऊस अधिक नोंद झाला आहे.या शिवाय पाथरी तालुक्याची वार्षिक सरासरी ७६८.५० मि.मी. असून या तालुक्यात ७७९ मि.मी. म्हणजे वार्षिक सरासरीच्या १०१ टक्के पाऊस झाला आहे. त्याच प्रमाणे पूर्णा तालुक्याची सरासरी ८०४ मि.मी. असून या तालुक्यात ७९६ मि.मी. (९० टक्के), गंगाखेड तालुक्याची वार्षिक सरासरी ६९७ मि.मी. असून या तालुक्यात ६४४.५० मि.मी. (९२ टक्के), सोनपेठ तालुक्याची वार्षिक सरासरी ६९७ मि.मी. असून तालुक्यात ५७९ मि.मी. (८३ टक्के), सेलू तालुक्यात ६५४ मि.मी. (८०.२ टक्के), मानवत तालुक्यात ८१६ मि.मी.पैकी ७०५ मि.मी. म्हणजे ८६.४ मि.मी. पाऊस झाला आहे.खडकपूर्णा प्रकल्पातून १० क्युसेस पाण्याचा विसर्ग४पूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्पातून २१ आॅक्टोबर रोजी पहाटे ३.३५ वाजता ७ दरवाजांमधून १० हजार ४०७ क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आवश्यकता भासल्यास हा विसर्ग वाढविला जाईल, अशी माहिती खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने दिली. त्यामुळे पूर्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या येलदरी प्रकल्पामध्ये १२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून सोडलेले पाणी येलदरी प्रकल्पामध्ये येणार आहे.४सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प दोन वर्षांपासून मृतसाठ्यात आहे. या प्रकल्पामध्ये सद्यस्थितीला मृतसाठ्यात ६२ दलघमी पाणी उपलब्ध आहे. निम्न दुधना प्रकल्पावर सेलू तालुक्यासह इतर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची भिस्त आहे. शनिवारी या तालुक्यात विक्रमी ११७ मि.मी. पाऊस झाला होता. या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सोमवारीही तालुक्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस