परभणी जिल्हा : दहावी परीक्षेसाठी ३१ हजार विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:27 IST2018-02-27T00:27:37+5:302018-02-27T00:27:44+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाच्या वतीने १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे़ या परीक्षेसाठी जिल्हाभरातून ३१ हजार ८८९ विद्यार्थी बसले आहेत़

परभणी जिल्हा : दहावी परीक्षेसाठी ३१ हजार विद्यार्थी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाच्या वतीने १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे़ या परीक्षेसाठी जिल्हाभरातून ३१ हजार ८८९ विद्यार्थी बसले आहेत़
राज्यभरामध्ये बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे़ यासोबतच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षाही १ मार्चपासून सुरू होत आहे़ २४ मार्च रोजी अंतीम पेपर आहे़ जिल्ह्यामध्ये यावर्षी ३१ हजार ८८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवेदनपत्र सादर केले आहेत़ यामध्ये परभणी तालुक्यामध्ये ११ हजार ७६७ विद्यार्थी असून, पूर्णा तालुक्यात ३ हजार २४६, गंगाखेड ४ हजार ४०५, पालम तालुक्यामध्ये १ हजार ५०६, सोनपेठ तालुक्यामध्ये १ हजार, जिंतूर तालुक्यात ४ हजार २०१, पाथरी तालुक्यात १ हजार ९७७, मानवत तालुक्यात १ हजार ३७४, सेलू तालुक्यात २ हजार ४१३ परिक्षार्थी विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले असून, एकूण ९५ परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत़ यामध्ये परभणी तालुक्यामध्ये ग्रामीण व शहरी मिळून ३५ केंद्रांचा समावेश आहे़ पूर्णा तालुक्यामध्ये ११, गंगाखेड १४, पालम ०५, सोनपेठ ४, जिंतूर १२, पाथरी ५, मानवत ३ तर सेलू तालुक्यामध्ये ६ परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत़