परभणी: मतदानाच्या टक्केवारीवरुन राजकीय वर्तूळात रंगताहेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:56 PM2019-04-19T23:56:14+5:302019-04-19T23:56:37+5:30

परभणी लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी ६३.१९ टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये ६४.४४ टक्के मतदान झाले होते. यावर्षी सव्वा टक्के मतदानात घट झाल्याने मतदानाची टक्केवारी चर्चेचा विषय बनली आहे.

Parbhani: Discussion from the percentage of voting in the political circles | परभणी: मतदानाच्या टक्केवारीवरुन राजकीय वर्तूळात रंगताहेत चर्चा

परभणी: मतदानाच्या टक्केवारीवरुन राजकीय वर्तूळात रंगताहेत चर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी ६३.१९ टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये ६४.४४ टक्के मतदान झाले होते. यावर्षी सव्वा टक्के मतदानात घट झाल्याने मतदानाची टक्केवारी चर्चेचा विषय बनली आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघ १९९८ चा अपवाद वगळता १९९१ पासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. १९९१ मध्ये या मतदारसंघात फक्त ४६.३३ टक्के मतदान झाले होते. १९९६ मध्ये ४८.६२ टक्के तर १९९८ मध्ये ५९.७४ टक्के मतदान झाले होते. १९९९ मध्ये ६६.८९ टक्के मतदान झाले. २००४ मध्ये ५८.४९ टक्के तर २००९ मध्ये ५४.८ टक्के मतदान झाले होते. २०१४ मध्ये यामध्ये जवळपास १०. ३६ टक्के मतांची वाढ होऊन ६४.४४ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे गेल्यावेळी ज्या दिवशी मतदान झाले होते. त्या दिवशी उन्हाचा पारा ४२ अंश होता. या कडक उन्हातही मतदानाची टक्केवारी वाढली होती. यावर्षी १८ एप्रिल रोजी मतदान झाले. त्यादिवशी जिल्ह्याचे तापमान ३९ अंश होते. तरीही मतदानाची टक्केवारी वाढली नाही. मतदानाची टक्केवारी घटल्याने या टक्केवारीचा फटका कोणाला बसेल? याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तूळात जोमाने सुरु झाली आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर अनिश्चितेचा खेळ संपून परभणी मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व अबाधित राहील की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला धोबीपछाड देऊन इतिहास निर्माण करेल, हे स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत अनेक अनपेक्षित गोष्टी पहावयास मिळाल्या. दिग्गज राजकीय नेत्यांच्या भूमिकांमध्ये अकलनीय बदल झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचे राजकीय भवितव्य ठरविणार आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय जाधव, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांच्यासह १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १९९८ चा अपवाद वगळता ३० वर्षांंपासून या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय निकाल लागतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मागच्या निवडणुकीत शिवसेनेला झाला फायदा
२००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये १०.३६ टक्के मतदान वाढले होते. या वाढीव मतदानाचा शिवसेनेला झाला फायदा झाल्याचे दिसून आले होते. यंदाची घट कोणासाठी घातक ठरते ते बघावे लागेल.
कुठे
मतमोजणी
सर्व टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. परभणी लोकसभा निवडणुकतील मतमोजणी वसंतराव नाईक़ मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात होईल.
१९ यंत्र बदलले
परभणी- मतदान प्रक्रियेत यंत्रात बिघाड झाल्याने १९ ठिकाणचे मतदान यंत्र बदलण्यात आले. त्यामध्ये जिंतूर, गंगाखेड, पाथरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ४ तर परभणी १ आणि परतूर व घनसावंगी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ३ मतदान यंत्र बदलण्यात आले.

Web Title: Parbhani: Discussion from the percentage of voting in the political circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.