परभणी: पार्किंग व्यवस्था नसल्याने अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:25 IST2019-07-09T00:25:48+5:302019-07-09T00:25:55+5:30
शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर वाहनतळाची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या राहणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. परिणामी किरकोळ वादाचे प्रकार घडत आहेत.

परभणी: पार्किंग व्यवस्था नसल्याने अडचण
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर वाहनतळाची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या राहणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. परिणामी किरकोळ वादाचे प्रकार घडत आहेत. बँकांसमोर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बँकांनी वाहनतळाची व्यवस्था करावी, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.
परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गंगाखेड शहरात भारतीय स्टेट बँक, आयडीबीआय, जुनी हैदराबाद बँक, बँक आॅफ महाराष्ट्रा, युको बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, सिडिंकेट, महाराष्ट्र ग्रामीण इ. राष्ट्रीयीकृत बँका आहेत. या बँकांबरोबर पतसंस्था व होमलोनचे कार्यालये भाडे करारावर घेतलेल्या इमारतीत आहेत. या बँका व पतसंस्थांची कार्यालये व्यापारपेठेतील मुख्य रस्त्यावर असून या भागात वाहनतळाची व्यवस्था नाही. त्यामुळे बँकांमध्ये कामानिमित्त येणाºया ग्राहकांची वाहने रस्त्यावरच अस्ताव्यस्त लावली जातात. परिणामी, वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनधारकांमध्ये किरकोळ वादविवाद होत आहेत.
मुख्य रस्त्यावर असलेल्या बँका आणि पतसंस्थांनी वाहनतळाची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नगरपालिकेचे दुर्लक्ष
४शहरात बांधल्या जाणाºया मोठ्या इमारती व व्यापारी संकुलाचे बांधकाम करुन विविध कार्यालये व बँकांसाठी भाडेतत्त्वावर दिले जातात; परंतु, या इमारतींकडे स्वतंत्र पार्किंग व्यवस्था अस्तित्वात नसते. त्यामुळे इमारतीच्या बाजूला असलेल्या मुख्य रस्त्यावरच वाहनधारक आपली वाहने लावतात. परिणामी, वाहतुकीचा प्रश्न निर्माण आहे. नगरपालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.