शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

परभणी: डिझेलअभावी थांबली एस.टी. बसची चाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:59 PM

येथील एस.टी. महामंडळाच्या परभणी आगारातील डिझेल संपल्याने मंगळवारी आणि बुधवारी दुपारपर्यंत सुमारे दीड हजार कि.मी.च्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्याची नामुष्की महामंडळावर ओढावली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील एस.टी. महामंडळाच्या परभणी आगारातील डिझेल संपल्याने मंगळवारी आणि बुधवारी दुपारपर्यंत सुमारे दीड हजार कि.मी.च्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्याची नामुष्की महामंडळावर ओढावली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.एस.टी. महामंडळाच्या परभणी येथील आगारातून दररोज शेकडो बसेस ग्रामीण भागातील वेगवेगळ्या मार्गावर धावतात. या बसेसना परभणी आगारातूनच डिझेलचा पुरवठा केला जातो. सोमवारी सायंकाळी आगारातील डिझेलचा साठा संपत आल्याने आॅनलाईन पद्धतीने डिझेलची नोंदणी करण्यात आली. मात्र डिझेल घेऊन येणारा टँकर बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास परभणी आगारात पोहोचला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या आगारातील डिझेलचा साठा संपला. त्यामुळे ग्रामीण भागात बस घेऊन जाणाऱ्या चालक आणि वाहकांना डिझेल उपलब्ध झाले नाही. परिणामी बसगाड्या जागेवरच उभ्या करण्यात आल्या. परभणीतून आगारातून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी ४ मार्गावरील बसफेºया रद्द झाल्या. सुमारे ५०० कि.मी. अंतरावर बसेस धावल्या नाहीत. तर बुधवारी देखील हीच समस्या उद्भवली. सकाळी ७ वाजेपासून आगारातून ग्रामीण भागात बसफेºया सोडल्या जातात. मात्र डिझेल नसल्याने बुधवारी देखील बसेस धावल्या नाहीत. त्यामुळे सकाळपासून चालक-वाहक आगारात ठाण मांडून बसले होेते. बुधवारी दिवसभरात १० बसफेºया रद्द झाल्या असून, साधारणत: १ हजार कि.मी. प्रवासाचा फटका महामंडळाला सहन करावा लागला.दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास डिझेलचे टँकर आगारात दाखल झाल्यानंतर डिझेल उतरवून घेण्यात आले. त्यानंतर ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत झाली. परभणी आगाराच्या या ढिसाळ कारभाराचा फटका ग्रामीण भागातील हजारो प्रवाशांना सहन कराव लागला. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील प्रवासी हेच एस.टी. महामंडळाचे मुख्य ग्राहक आहेत. शहरी भागातील बहुतांश प्रवासी रेल्वे, खाजगी वाहतुकीचा पर्याय निवडतात; परंतु ज्या प्रवाशांच्या भरोस्यावर महामंडळ उत्पन्न घेते, त्याच प्रवाशांना वाºयावर सोडल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.आगारप्रमुखांची बघ्याची भूमिकाआगारातील डिझेल संपत असल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारी रात्री जिंतूर आगारातून सुमारे साडेतीन हजार लिटर डिझेल मागवून घेण्यात आले होेते. त्यामुळे मंगळवारी दिवसभराच्या बसफेºया करणे शक्य झाले असते; परंतु आगारप्रमुखांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले नाही. डिझेल उपलब्ध असतानाही संपल्याचे सांगत वाहक आणि चालकांना डिझेल देण्यात आले नाही. जिंतूरहून आणलेले डिझेल बसगाड्यांमध्ये भरायचे कोणी? असा प्रश्न होता. त्यामुळे हे डिझेल वापरलेच नाही. परिणामी हजारो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. आगार प्रमुखाच्या या भोंगळ कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.पैसे नसल्याने ओढवला प्रसंगएस.टी. महामंडळाच्या परभणी आगाराच्या इतिहासात प्रथमच डिझेलसाठी पैसे नसल्याने वेळेत डिझेल खरेदी करता आले नाही. परिणामी डिझेलअभावी बसेस धावल्या नसल्याचे समोर आले आहे. परभणी आगाराला दोन दिवसांना १२ हजार लिटर डिझेल लागते. जवळपास ८ लाख ८४ हजार रुपये भरल्यानंतर डिझेल उपलब्ध होते. मात्र सोमवारी आगारात डिझेलसाठी पैसे उपलब्ध नसल्याने वेळेत डिझेलची नोंदणी झाली नाही. त्यामुळेच बसफेºया रद्द करण्याची वेळ आगारावर ओढावली.

टॅग्स :parabhaniपरभणीDieselडिझेलstate transportराज्य परीवहन महामंडळ