शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

परभणी : ६५ गावांच्या नशिबी दुष्काळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:36 IST

गोदावरी खोरे, जायकवाडी प्रकल्प आणि निम्न दुधना प्रकल्प अशा तिन्ही प्रकल्पांच्या लाभापासून मानवत आणि परभणी तालुक्यातील सुमारे ६५ गावे वंचित असून या तिन्ही प्रकल्पांचे पाणी गावापर्यंत पोहोचत नसल्याने कायमचा दुष्काळ या गावांच्या नशिबी आला आहे. वर्षानुवर्षापासून टंचाईच्या गर्तेत असलेल्या या गावांसाठी ठोस उपाययोजना करावी, यासाठी आता ग्रामस्थांनी ६५ गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गोदावरी खोरे, जायकवाडी प्रकल्प आणि निम्न दुधना प्रकल्प अशा तिन्ही प्रकल्पांच्या लाभापासून मानवत आणि परभणी तालुक्यातील सुमारे ६५ गावे वंचित असून या तिन्ही प्रकल्पांचे पाणी गावापर्यंत पोहोचत नसल्याने कायमचा दुष्काळ या गावांच्या नशिबी आला आहे. वर्षानुवर्षापासून टंचाईच्या गर्तेत असलेल्या या गावांसाठी ठोस उपाययोजना करावी, यासाठी आता ग्रामस्थांनी ६५ गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केला आहे.मानवत तालुक्यातील मानोली ते परभणी तालुक्यातील नांदगाव या पट्ट्यामध्ये एकाही प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ ग्रामस्थांना मिळत नाही. जायकवाडीचा कालवा असो अथवा निम्न दुधना प्रकल्पाचा कालवा, या गावांच्या शेजारुन गेला; मात्र गावापर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे स्वातंत्र्यापासून दुष्काळाच्या झळा येथील ग्रामस्थ सहन करीत आहेत. या ६५ गावांच्या शिवारात प्रत्येक गावातील १ हजार हेक्टर जमीन अशी सुमारे ६५ हजार हेक्टर जमीन सिंचनापासून दूर आहे. स्थानिक पातळीवर भूजल स्त्रोत निर्माण करुन गावकरी पिके घेतात. मात्र प्रकल्पाच्या पाण्याचा वाटा ग्रामस्थांपर्यंत पोहचलेला नाही. त्यामुळे आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागते. तिन्ही प्रकल्पांतील मध्यभाग असलेल्या या गावांमध्ये आता मागील काही दिवसांपासून जनजागृती करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपले ठराव तयार केले असून जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. साधारणत: २००९ पासून गावकऱ्यांना एकत्रित करीत पाठपुरावा केला जात आहे. हा प्रश्न मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांपर्यंतही पोहोचला आहे; परंतु, अद्यापपर्यंत या ठिकाणी ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे अजूनही ग्रामस्थांचा संघर्ष सुरु आहे. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. बाराही महिने विहिरींचे पाणी तळाला असते. यासाठी आता ६५ गाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. गावा-गावात जनजागरण केले जात असून लवकरच ग्रामस्थ समितीच्या माध्यमातून आंदोलनाच्या तयारीत आहेत.काय केल्यास मिटेल प्रश्न ?या ६५ गावातील पाण्याच्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात राबविलेल्या उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या धर्तीवर बंधाºयातून किंवा जायकवाडी प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्पातून उपसा जलसिंचन प्रकल्प हाती घेतल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. परभणी तालुक्यातील पेडगाव किंवा मानवत तालुक्यातील आंबेगाव पाझर तलावात निम्न दुधना प्रकल्पातील पाणी सोडल्यास या भागातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटू शकतो, असे ६५ गाव संघर्ष समितीचे बाळासाहेब भालेराव यांनी सांगितले.ही आहेत कायम दुष्काळी गावेपरभणी तालुका- आळंद, मांडाखळी, मोहपुरी, गव्हा, पान्हेरा, पेडगाव, जांब, सोन्ना, बाभूळगाव, पारवा, उजळंबा, उमरी, नरसापूर, डफवाडी, नागापूर, ब्राह्मणगाव, कौडगाव, भोगाव, हसनापूर, तुळजापूर, शहापूर, टाकळी कुंभकर्ण, धर्मापुरी, धारणगाव, साटला, हिंगला, समसापूर, सनपुरी, करडगाव, धार, दुर्डी, साबा, मुरुंबा, नांदगाव, राहटी. मानवत तालुका: पिंपळा, पाळोदी, मांडेवडगाव, जंगमवाडी, सावरगाव, सावळी, आंबेगाव, देवलगाव, हत्तलवाडी, बोंदरवाडी, खडकवाडी, नागरजवळा, खरबा, करंजी, रुढी, मानवत रोड, कोल्हा, कोल्हावाडी, ताडबोरगाव, इठलापूर, मानोली या गावांचा दुष्काळी गावांत समावेश आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळ