शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

परभणी : पाऊस नसल्याने टँकर सुरू ठेवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:05 IST

जुलै महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न पडल्याने पंचायत समितीने उन्हाळ्यात सुरू केलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): जुलै महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न पडल्याने पंचायत समितीने उन्हाळ्यात सुरू केलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने आणि भीषण पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली. परिणामी फेब्रुवारी महिन्यापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके बसू लागले. त्यामुळे अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवावी लागली. सलग ४ वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांंना यंदा उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली. अनेक गावातील हातपंप कोरडेठाक पडले. इतर पाण्याचे स्रोत आटले. तसेच पाणीपुरवठा करणाºया विहिरींनी तळ गाठला. त्यामुळे अनेक गावात ग्रामपंचायतीने उपलब्ध पाणी स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला. काही गावातील पाणी स्त्रोत पूर्णपणे आटत गेले. त्यामुळे वालूर, हट्टा, सिमणगाव, गुळखंड, तळतुंबा, नागठाणा, पिंपळगाव गोसावी, पिंपरी या गावांना एप्रिल आणि मे महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. वालूर हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असल्याने या ठिकाणी १२ हजार लिटर टँकरच्या ३ तर २४ हजार लिटरच्या ३ खेप, हट्टा, सिमणगाव येथे प्रत्येकी २४ हजार लिटर टँकरची एक, गुळखंड येथे ५ हजार लिटर टँकरच्या २, तळतुंबा येथे १२ हजार लिटरच्या २, नागठाणा येथे २४ हजार लिटरच्या २ खेपा तसेच पिंपळगाव गोसावी, पिंपरी या गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु, २४ जूनपर्यंतच टँकरने पाणीपुरवठा करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर जुलै महिन्यात टँकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला; परंतु, जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने हातपंप आणि पाणीपुरवठा करणाºया विहिरींची पाणीपातळी वाढली नाही. त्यामुळे पाणीटंचाई कमी झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा या गावांचे टँकर सुरू करावे, अशी शिफारस करण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.टँकर सुरू ठेवा : पाच गावांतून दाखल झाले प्रस्ताव४अद्यापही पाणी टंचाई दूर न झाल्याने नागठाणा, कुंभारी, तळतुंबा, पिंपळगाव, गोसावी, गुळखंड, पिंपरी या गावात उन्हाळ्यात सुरू असलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, असा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे.४सेलू तालुक्यातील या गाव परिसरात येत्या १५ दिवसांत पाऊस नाही झाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. पाऊस झाला नाही तर पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाला उपाययोजना करावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ