परभणी : उपायुक्तांच्या खुर्चीला घातला हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:18 IST2018-06-14T00:18:01+5:302018-06-14T00:18:01+5:30
येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयातील उपायुक्त वंदना कोचुरे या अनेक दिवसांपासून गैरहजर असल्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने बुधवारी उपायुक्तांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन करण्यात आले़

परभणी : उपायुक्तांच्या खुर्चीला घातला हार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयातील उपायुक्त वंदना कोचुरे या अनेक दिवसांपासून गैरहजर असल्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने बुधवारी उपायुक्तांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन करण्यात आले़
जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपायुक्त वंदना कोचुरे या अनेक दिवसांपासून कामावर गैरहजर आहेत़ सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र सुरू आहे़ विद्यार्थ्यांना प्रवेश व इतर कारणांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज असते़ मात्र उपायुक्तच सतत गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांना व नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने बुधवारी जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयातील उपायुक्त वंदना कोचुरे यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध करण्यात आला़ या आंदोलनात सुमंत वाघ, दीपक वारकरी, गंगा ठाकूर, ओंकार वडकुते, वैभव शिंदे, सुदर्शन काळे, सुदेश कांबळे, पुरुषोत्तम शिंदे, शुभम घुगे आदींचा सहभाग होता़