परभणी : एमआयडीसी संदर्भात १५ दिवसांत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:03 IST2018-03-08T00:02:57+5:302018-03-08T00:03:31+5:30
परभणीपासून जवळच असलेल्या बाभळगाव परिसरात प्रस्तावित केलेल्या नवीन एमआयडीसी संदर्भात येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत, अशी माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़

परभणी : एमआयडीसी संदर्भात १५ दिवसांत निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणीपासून जवळच असलेल्या बाभळगाव परिसरात प्रस्तावित केलेल्या नवीन एमआयडीसी संदर्भात येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत, अशी माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़
मुंबई येथे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बैठक पार पडली़ यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, आ़ डॉ़ राहुल पाटील, उद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ रमेश सुरवाडे, भूसंपादन महाव्यवस्थापक गोपीनाथ ठोंबरे, प्रादेशिक अधिकारी संजय कोतवाड, क्षेत्रीय व्यवस्थापक एम़ आऱ महाडिक, उपविभागीय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे, उद्योजक प्रतिनिधी ओमप्रकाश डागा, गोविंद अजमेरा, शेतकरी प्रतिनिधी दौलतराव मस्के, मुसा रज्जाक पटेल आदींची उपस्थिती होती़ यावेळी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी सांगितले की, परभणी येथे मागील ५० वर्षांपासून १०० हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसी अस्तित्वात असून, या ठिकाणी केवळ लघु सुक्ष्म उद्योग व्यवसाय कसे बसे उभे आहेत़ सद्यस्थितीत जिल्ह्याच्या आर्थिक विकास व रोजगार निर्मितीसाठी मोठे उद्योग उभारणे गरजेचे आहे़ परभणी जिल्ह्यात उत्पादित होत असलेल्या शेतमालावर प्रक्रिया करणारे मोठे उद्योग उभारून विकासाला चालना देण्यासाठी आपण पुढाकार घेऊन उद्योगमंत्र्यांकड आग्रही मागणी केली़ काही दिवसांपूर्वी परभणीला टेक्सस्टाईल पार्क घोषित होवूनही केवळ जागेअभावी हा प्रकल्प उभारणीस अडचणी निर्माण झाल्या आहेत़ त्यामुळे बाभळगाव परिसरातील जमिनी उपलब्ध करून देण्याबाबत शेतकºयांनी होकार दिला आहे़ या बैठकीत मोबदला देण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली़ बाभळगाव येथील ३०० हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात येणार असून, शेतकºयांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिले आहे़ तेव्हा एमआयडीसी संदर्भात येत्या १५ दिवसांत योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश सुभाष देसाई यांनी अधिकाºयांना दिले़