परभणी : गंगाखेड बसस्थानकावर प्रवाशाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:58 IST2018-06-16T00:58:07+5:302018-06-16T00:58:07+5:30
हृदयविकाराचा झटका आल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना १५ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गंगाखेड बसस्थानकावर घडली.

परभणी : गंगाखेड बसस्थानकावर प्रवाशाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : हृदयविकाराचा झटका आल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना १५ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गंगाखेड बसस्थानकावर घडली.
बसस्थानकावर एक व्यक्ती मृत अवस्थेत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस जमादार रंगनाथ देवकर, साहेब मानेबोईनवाड, माणिक वाघ यांनी स्थानकावर दाखल होऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला तेव्हा मयत व्यक्ती हा पडेगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले. लक्ष्मण धारबा बोबडे (४५) असे मयत व्यक्तीचे नाव असल्याचे त्यांच्या जवळील आधारकार्डावरुन स्पष्ट झाले. लक्ष्मण यांचा पुतण्या बालासाहेब बोबडे यांनी दिलेल्या माहितीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.