परभणी : ट्रॅक्टरचालकासह १० मजुरांवर अवैध वाळू चोरी प्रकरणी गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:56 IST2018-01-28T23:56:07+5:302018-01-28T23:56:11+5:30
अवैध वाळूचे उत्खनन करुन वाळू चोरणाºया ट्रक्टर चालकासह १० मजुरांवर सोनपेठ पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई महसूल विभागाने तालुक्यातील मोहळा शिवारात केली आहे.

परभणी : ट्रॅक्टरचालकासह १० मजुरांवर अवैध वाळू चोरी प्रकरणी गुन्हे
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : अवैध वाळूचे उत्खनन करुन वाळू चोरणाºया ट्रक्टर चालकासह १० मजुरांवर सोनपेठ पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई महसूल विभागाने तालुक्यातील मोहळा शिवारात केली आहे.
सोनपेठ तालुक्यातील मोहळा शिवारातील वाळू घाटावर @& २७ जानेवारी रोजी रात्री जिल्हाधिकारी यांचे पथक गेले असल्याची माहिती सोनपेठ तहसील प्रशासनाला समजली. त्यानंतर तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार तलाठी परमानंद जेमशेटे, अनिल कदम यांचे पथक शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रातील मोहळा शिवारात गेले. यावेळी या पथकाला एका ट्रॅक्टरसह चालक व १० मजूर वाळू भरत असताना आढळून आले. पथकाने जवळ जाऊन वाळूची पावती विचारली असता त्यांच्याकडे आढळून आली नाही. यावरुन २८ जानेवारी रोजी तलाठी रमेश लटपटे यांच्या फिर्यादीवरुन सोनपेठ पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालकासह १० मजुरांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये ट्रॅक्टर चालक लक्ष्मण जाधव, मजूर बाळासाहेब कांबळे, बंडू टाळकुटे, रवि कोकाटे, राजेभाऊ ठोंबरे, भैय्यासाहेब कांबळे, कपील कांबळे, दीपक कांबळे, प्रमोद कोकाटे, रतन कोकाटे, मंगेश कांबळे (सर्व रा.मैराळ सावंगी ता.गंगाखेड) यांचा समावेश आहे. या प्रकरणात ट्रॅक्टर चालकासह मजुरांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश कातकडे तपास करीत आहेत.