शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रजेवरील कर्मचाऱ्यांचे ७५ लाख हडपले! परभणीत पशुधन पर्यवेक्षकाचा अजब घोटाळा उघड

By राजन मगरुळकर | Updated: February 27, 2026 18:56 IST

७५ लाखांचा डल्ला मारणारा 'तो' पर्यवेक्षक पोलिसांच्या जाळ्यात! ५५ लाख केले जमा, तरीही कारवाईचा बडगा कायम

परभणी : पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन विभाग कार्यालयात कार्यरत पशुधन पर्यवेक्षकाने पदाचा दुरुपयोग करून दोन कर्मचाऱ्यांच्या नावे देय असलेली शासकीय रक्कम त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक बदलून स्वतःच्या बँक खात्यात वळती करून ७५ लाख ९१ हजार ६५५ रुपयांचा अपहार केला. हा प्रकार जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडला. याप्रकरणी पशुधन पर्यवेक्षक याच्याविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला.

राजीव माधवराव गावंडे (पशुधन पर्यवेक्षक, पशुसंवर्धन विभाग, पं.स.परभणी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक आयुक्त जगन कुंडलिकराव सोळंके यांनी नानलपेठ ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी पशुधन पर्यवेक्षक राजीव गावंडे हे सन २०१४ पासून कार्यरत असून परभणी तालुक्यातील वर्ग तीन, चार कर्मचाऱ्यांचे वेतन देयक तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याचे काम नियमित करतात. या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकात तफावत निदर्शनास आल्याने त्यांनी ही बाब कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या सूचनेनुसार मुख्य लेखा वित्त अधिकारी यांनी प्राथमिक चौकशी केली. त्यात वेतन देयक तपासणी दरम्यान तफावत झाल्याचे आढळून आले. हा सर्व प्रकार जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडला.

यांची रक्कम वळविली स्वतःच्या खात्यातपशुधन पर्यवेक्षक राजीव गावंडे यांनी तत्कालीन पशुधन पर्यवेक्षक सुचिता शिंदे या परभणी जिल्ह्यातून कार्यमुक्त झाल्यानंतरही त्यांच्या नावे एकूण पाच लाख ७९ हजार ७८२ रुपये व परिचर राजेश पांडुरंग घाडगे हे वैद्यकीय रजेवर असतानाही त्यांच्या नावे एकूण ७० लाख ११ हजार ८७३ रुपये संबंधितांचे असलेले बँक खाते क्रमांक बदलून त्या जागी स्वतःचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नानलपेठ येथील खात्यात ही दोन्हीही रक्कम वळती करून अपहार केल्याचे निदर्शनास आले.

५५ लाख शासन खाती केले जमाया प्रकरणात सहाय्यक पोलिस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्यासह संबंधित विभागाने राजीव गावंडे यांच्याकडील ५५ लाख ५५ हजार ४४ रुपये चलनाद्वारे शासन खात्यात जमा केले आहेत. उर्वरित २० लाख ३६ हजार ६११ रुपये रक्कम बाकी आहे. नमूद आरोपी राजीव गावंडे यास पोलिसांनी अटक केली असून त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात अजून सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani livestock supervisor embezzles funds meant for employees on leave.

Web Summary : Livestock supervisor in Parbhani siphoned ₹75.91 lakh meant for two employees, including those on leave, by diverting funds into his account. Police arrested the supervisor, recovering ₹55.55 lakh. Further investigation is underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीparabhaniपरभणी