परभणी:पूर्णा नगराध्यक्षांविरुद्ध नगरसेवकाची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:19 IST2019-03-13T00:18:31+5:302019-03-13T00:19:19+5:30
पूर्णा येथील नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या कामकाजासंदर्भात नगरसेवक मुकूंद भोळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे अनियमित कामकाजासंदर्भात तक्रार केली आहे.

परभणी:पूर्णा नगराध्यक्षांविरुद्ध नगरसेवकाची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पूर्णा येथील नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या कामकाजासंदर्भात नगरसेवक मुकूंद भोळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे अनियमित कामकाजासंदर्भात तक्रार केली आहे.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, नगराध्यक्षा एकलारे यांचे काम त्यांचे नातेवाईक पाहतात. शिवाय त्यांचे नातेवाईकच कंत्राट घेण्याचे काम करतात. मर्जीतील कंत्राटदारांना त्यांच्याकडून कामे दिली जातात. यासाठी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्याकडूनही सदोष कार्यपद्धतीचा वापर केला जात आहे. त्यामुळे किरुळकर यांच्यावर कारवाई करुन एकलारे यांना पदावरुन हटवावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी ६४ कामे पूर्ण झाली नसताना ती अंदाजपत्रकाप्रमाणे व चांगल्या गुणवत्तेची झाल्याचे बनावट प्रमाणपत्र घेऊन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करावी, असेही निवेदनात भोळे यांनी म्हटले आहे. निवेदनासोबत त्यांनी ६४ कामांची यादीही जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.
नियमानुसारच कामे केली -गंगाबाई एकलारे
४नगरपालिका सर्वसाधारण सभा व जिल्हाधिकाºयांच्या परवानगीनेच विकासकामे करण्यात आली आहेत. यापूर्वीही तक्रारीनंतर याबाबत चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये तथ्य आढळले नाही. नगराध्यक्ष पदाचा कारभार मी स्वत: पाहते, त्यात कोणाचाही हस्तक्षेप नाही.