परभणी : गंगाखेड नगरपालिका उपनगराध्यक्षपदी कॉँग्रेसचे लव्हाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:47 IST2018-12-30T00:46:33+5:302018-12-30T00:47:19+5:30
येथील उपनगराध्यक्षपदासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत कॉँग्रेसचे गोपीनाथ लव्हाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेला काँग्रेसचे ३ व रासपचे ३ असे ६ नगरसेवक गैरहजर राहिले.

परभणी : गंगाखेड नगरपालिका उपनगराध्यक्षपदी कॉँग्रेसचे लव्हाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : येथील उपनगराध्यक्षपदासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत कॉँग्रेसचे गोपीनाथ लव्हाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेला काँग्रेसचे ३ व रासपचे ३ असे ६ नगरसेवक गैरहजर राहिले.
गंगाखेड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे यांच्यावर नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी नगरपालिकेच्या स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात शनिवारी सकाळी १० ते १२ यावेळेत सभा घेण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी गोपीनाथ शिवाजी लव्हाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने उपनगराध्यक्षपदी लव्हाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी जाहीर केले.
उपनगराध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान ज्योती चौधरी, स्मिताताई भालेराव, शेख तलत मुस्तफा, ज्योती शेट्टे, प्रतिभा सानप, अॅड.सय्यद अकबर, नंदिनीताई जाधवर, अॅड. शेख कलीम, चंद्रकांत खंदारे, अजिज खान, सावित्रीबाई गुडे, विमलबाई घोबाळे, नागनाथ कासले, मनिषा मस्के, विशाल साळवे, सीमाताई राखे, तुकाराम तांदळे, राजकुमार सावंत, सुनिल चौधरी आदी नगरसेवकांची उपस्थिती होती.
पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी नानासाहेब कामटे, अनिल समिंद्रे यांनी सहकार्य केले. दरम्यान, उपनगराध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर कॉँग्रेस, राष्टÑवादी, भाजप व अपक्ष नगरसेवकांनी न.प. सभागृहापासून मिरवणूक काढली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उपनगराध्यक्ष निवडी दरम्यान कॉँग्रेस पक्षाचे गोपीनाथ लव्हाळे हे उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार असून सुद्धा कॉँग्रेस पक्षाच्या ८ नगरसेवकांपैकी शेख इस्माईल, राजश्री दामा, शैलाबाई ओझा हे तीन नगरसेवक अनुपस्थित राहिले. राष्टÑीय समाज पक्षाचे सत्यपाल साळवे, राजू पटेल, राधाकिशन शिंदे हेही अनुपस्थित राहिले. त्यामुळे उपनगराध्यक्ष निवडीसाठी घेतलेल्या सर्वसाधारण सभेस ६ नगरसेवक गैरहजर होते. कॉँग्रेसचे नगरसेवक शेख इस्माईल हे नगरपालिका परिसरात असूनही सभागृहात उपस्थित राहिले नाहीत, हे विशेष.