शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

परभणी : रंगीत खडूंनी रेखाटले शिवरायांचे लक्षवेधक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:08 AM

शिक्षक आणि शाळा आठवलं की समोर येतो तो वर्गातील काळा फळा. या काळ्या फळ्यावर अंक आणि अक्षरांशिवाय क्वचितच दुसरे काही नजरेत पडते. मात्र पाथरी तालुक्यातील माळीवाडा येथील जिल्हा परिषदेच्या आंतरराष्ट्रीय शाळेत एक शिक्षक याच काळ्या फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने लक्षवेधक चित्र रेखाटतात. पंकज बिरादार असे या शिक्षकाचे नाव आहे.

सुमेध उघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिक्षक आणि शाळा आठवलं की समोर येतो तो वर्गातील काळा फळा. या काळ्या फळ्यावर अंक आणि अक्षरांशिवाय क्वचितच दुसरे काही नजरेत पडते. मात्र पाथरी तालुक्यातील माळीवाडा येथील जिल्हा परिषदेच्या आंतरराष्ट्रीय शाळेत एक शिक्षक याच काळ्या फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने लक्षवेधक चित्र रेखाटतात. पंकज बिरादार असे या शिक्षकाचे नाव आहे. मेहनत आणि कल्पकतेच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी त्यांनी रेखाटलेले चित्र दिवसभर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय बनले होते़परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यात माळीवाडा येथे जि़प़ची भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. या शाळेत पंकज बिरादार मागील वर्षभरापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुळचे उदगीर तालुक्यातील बिरादार यांना चित्रकलेची आवड आहे. मात्र त्यांनी याचे कुठेही शिक्षण घेतले नाही. शाळेत 'फलक लेखन' असा शिक्षकांच्या कायार्चा एक भाग असतो. यातूनच त्यांनी बोर्डवर रंगीत खडूंच्या सहाय्याने चित्र रेखाटन सुरु केले. विद्यार्थ्यांना दिनविशेष समजावून सांगण्यात त्यांच्या या चित्रांची मोठी मदत होत आहे. आकर्षक रंगसंगतीत रेखाटलेली ही चित्रे शिक्षकांच्या वतुर्ळात चर्चेची ठरली आहेत़यातूनच त्यांची रेखाटने सोशल मीडियातून व्हायरल झाली. अंक आणि अक्षरांशिवाय काळ्या फळ्यावरची ही आकर्षक रेखाटने सध्या चर्चेची ठरत आहेत.पुण्यावरून मागविला जातो विशेष खडू४रेखाटन करण्यासाठी लागणारे रंगीत खडू परभणी जिल्ह्यात उपलब्ध होत नाहीत. यामुळे बिरादार हे खडू पुण्यातून मागवतात. मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी याच खडूंच्या सहाय्याने शुभेच्छा चित्र रेखाटले आहे. हे चित्र रेखाटण्यासाठी त्यांना अडीच तासांचा अवधी लागला. शिवजयंती दिनीच उत्कृष्ट छायाचित्र त्यांनी रेखाटल्याने त्यांचे हे चित्र लागलीच सोशल मीडियावर व्हायरल झाले. यासोबतच त्यांनी नुकताच झालेला पुलवामा येथील दहशवादी हल्ला, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, म़ गांधी, लालबहादूर शास्त्री, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला आदींसदर्भात सुरेख चित्रे रेखाटली आहेत.छंद म्हणून जोपसनाशाळेत 'फलक लेखन' या प्रकारातून मला रेखाटन करण्याचा छंद जडला. यातूनच रंगीत खडूंच्या सहाय्याने मी दिनविशेष वेगळ्या पध्दतीने रेखाटने सुरु केले. येथे येताच शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व सहकारी शिक्षकांनी मला सातत्याने प्रोत्साहन दिले. यामुळे माझ्या छंदाची जोपासना होतेच, शिवाय विद्यार्थ्यांना एका वेगळ्या कलेची ओळखही होते.-पंकज बिरादार, प्राथमिक शिक्षक, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळाराज्यमंत्री सदाभाऊ खोत झाले प्रभावितकाही दिवसांपूर्वी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शाळेस भेट दिली. यावेळी बिरादार यांनी त्यांच्या समक्षच केवळ १० मिनिटात खडूंच्या सहाय्याने त्यांचे चित्र रेखाटले. यामुळे प्रभावित झालेल्या खोत यांनी त्यांचे कौतुक केले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षक