शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

परभणी : पक्षी, झाडांच्या संवर्धनासाठी सरसावले पांगरीतील चिमुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:48 PM

जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात दोन वर्षापूर्वी लावलेल्या ४० ते ५० झाडांचे दुष्काळी परिस्थितीत संवर्धन व्हावे, यासाठी या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वत:हून प्रयत्न सुरू केले आहेत़ झाडांच्या बुडाला टाकाऊ बाटल्यांच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे़ विद्यार्थ्यांचा हा उपक्रम पर्यावरण प्रेमींसाठी प्रेरणा देणारा ठरत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात दोन वर्षापूर्वी लावलेल्या ४० ते ५० झाडांचे दुष्काळी परिस्थितीत संवर्धन व्हावे, यासाठी या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वत:हून प्रयत्न सुरू केले आहेत़ झाडांच्या बुडाला टाकाऊ बाटल्यांच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे़ विद्यार्थ्यांचा हा उपक्रम पर्यावरण प्रेमींसाठी प्रेरणा देणारा ठरत आहे़पांगरी येथील जि़प़ शाळेत दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात़ त्यातूनच दोन वर्षांपूर्वी शाळेच्या आवारात फुले आणि फळांची सुमारे ५० झाडे लावण्यात आली़ सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ही झाडे पाण्याअभावी कोमेजू नयेत यासाठी विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतला आहे़ दररोजच्या जेवणाच्या डब्यासोबत आणलेले पाणी शिल्लक राहिल्यानंतर झाडांना दिले जाते़ याशिवाय प्रत्येक झाडाच्या बुडाला बाटली लावून त्यात सुतळी सोडून थेंब थेब पाणी देण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला आहे़ शाळेच्या परिसरातील प्रत्येक झाडाला बाटलीच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे़ झाडे जगविण्याचा विद्यार्थ्यांचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे़ दुष्काळी परिस्थितीत अनेक भाग पाण्याअभावी ओसाड पडलेला दिसत असला तरी जि़प़ शाळेचा परिसर मात्र आजही हिरवागार दिसत आहे़ शाळेच्या आवारात बऱ्यापैकी झाडी झाली असून, फुलझाडांनी हा परिसर शोभीवंत झाला आहे़विशेष म्हणजे केवळ झाडांना पाणी देण्यापर्यंतच विद्यार्थी थांबले नाहीत तर या झाडांवर येणाºया पक्षांचीही चिंता विद्यार्थ्यांना लागली होती़ त्यातूनच जुन्या मोठ्या झाडांवर पक्ष्यांसाठी पाण्याची सुविधा करण्यात आली आहे़ प्रत्येक झाडावर टोपली वजा शिंकाडे बांधून पक्ष्यांसाठी पाण्याची सुविधा विद्यार्थ्यांनी केली आहे़ शाळेचे मुख्याध्यापक के़सी़ घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक मंडळीही या कामी मुलांना प्रोत्साहन देत आहे़एक हजार झाडांची रोपवाटिकाआगामी काळात वृक्षारोपण करण्यासाठी विद्यार्थी आतापासूनच कामाला लागले आहेत़ बोर, सिताफळ, लिंबोळी आदी झाडांच्या बियांपासून एक हजार रोपे तयार केली जात आहेत़ परिसरातील मैनापुरी डोंगर आणि इतर ठिकाणी ही झाडे लावली जाणार आहेत़ एक मुल ३० झाड हे अभियान सुरू केले असल्याची माहिती मुख्याध्यापक के़सी़ घुगे यांनी दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळStudentविद्यार्थी