शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

परभणी : वाळूची वाहने ग्रामसेवक, सरपंचांना तपासता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:18 IST

सुधारित वाळू निर्गती धोरणातील तरतुदीनुसार वाळू लिलाव धारकांकडून वाहतूक करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पासची तपासणी संबंधित गावातील ग्रामसेवक व सरपंचांना करता येईल, अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा सभागृहात दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सुधारित वाळू निर्गती धोरणातील तरतुदीनुसार वाळू लिलाव धारकांकडून वाहतूक करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पासची तपासणी संबंधित गावातील ग्रामसेवक व सरपंचांना करता येईल, अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा सभागृहात दिली़परभणीचे आ़ डॉ़ राहुल पाटील, पाथरीचे आ़ मोहन फड यांच्यासह इतर आमदारांनी या विषयावर विधानसभेत चालू अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. त्यात शासनाने वाळू उत्खननासाठी नवीन धोरण आखले आहे. या धोरणांतर्गत वाळू लिलावाच्या रकमेच्या प्रमाणात संबंधित ग्रामपंचायतीला निधी देण्यात येणार असून, सदर निधी त्या गावातील रस्ते, आरोग्यविषयक सुविधांसाठी वापरला जाणार असल्याचे तसेच वाळू वाहतूक करणाºया वाहनांची तपासणी करण्याचे सरपंच व ग्रामसेवकांना अधिकार दिले आहेत़ हे खरे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला होता़ हा प्रश्न अतारांकीत झाला असून, त्याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी माहिती दिली आहे़ त्यामध्ये ३ जानेवारी २०१८ नुसार सुधारित वाळू/रेती निर्गती धोरणातील तरतुदीनुसार वाळू लिलावामध्ये ग्रामपंचायतींना सहभागी करून घेण्याच्या अनुषंगाने ग्रामसभेने वाळू लिलावास संमती दिल्यास विनाअडथळा उत्खनन करणे शक्य झाल्यास लिलाव वर्ष संपल्यानंतर ठराविक रक्कम ग्रामपंचायतीला मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे़ सदर निधी कोणत्या बाबीसाठी वापरावा, याचा उल्लेख शासनाने काढलेल्या निर्णयामध्ये करण्यात आलेला नाही़ तसेच वाळू धोरणांतर्गत वाळू लिलाव धारकांकडून वाळू वाहतूक करण्यात येणाºया वाळू वाहनासोबतच्या वाहतूक पासची तपासणी संबंधित गावचे ग्रामसेवक व सरपंच यांना करता येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे़तसेच वाळू लिलाव धारकास सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास बसविणे बंधनकारक करण्यात आले असून, वाळू उत्खननासाठी तसेच नदीपात्रातील वाळू वाहनात भरण्यासाठी पोकलेन, जेसीबी अशा कोणत्याही यांत्रिक साधनांचा वापर अनुज्ञेय नसल्याची तरतूद करण्यात आली आहे़ सकाळी ६ ते सायंकाळी ६ कालावधीतच वाळू उपसा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे, असेही या संदर्भातील लेखी उत्तरात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे़वाळू विक्रीचे दर शासन निर्धारित करीत नाही तर स्पर्धात्मक बाबीतून निश्चित होतात दर४वाळूच्या अनुषंगानेच अन्य एका प्रश्नावर लेखी उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, शासनाकडून वाळुचे स्वामीत्व व जिल्हाधिकाऱ्यांकडून वाळू गट लिलावासाठी हातची किंमत विहित करण्यात येते़ वाळू विक्रीचे दर निर्धारित केले जात नाहीत़ बाजारात वाळू विक्रीचे दर हे पुरवठा व मागणी यांच्या अनुषंगाने ठरत असून, शासन सदर दरांवर नियंत्रण ठेवत नाही तसेच या कामी नियमावली करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन नाही़ सुधारित वाळू धोरणा अंतर्गत वाळू लिलावाची हातची किंमत निश्चित झाल्यानंतर लिलाव प्रक्रिया राबविण्यात येऊन लिलावास सर्वोच्च बोली नोंदविणाºयास वाळूसाठा निश्चित कालावधीसाठी मंजूर करण्यात येतो, या प्रकारे स्पर्धात्मक दर निश्चित होतात़, असेही पाटील यांनी म्हटले आहे़शासन निर्णयाला जिल्ह्यात दिला जातो खो४परभणी जिल्ह्यात सध्या अनाधिकृतपणे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत आहे़ यासाठी यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे़४जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी वाळूमाफियांवर कारवाईसाठी कडक भूमिका घेतली असली तरी त्यांना महसूलमधील इतर अधिकाºयांकडून फारशी साथ मिळत नाही़ वाळूमाफियांनी जिल्हाधिकारी, काही तहसीलदार यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खबरे नियुक्त केले असून, ते खबरे याबाबतची इत्भूंत माहिती त्यांना देत आहेत़४यामुळे कारवाईत बडे मासे गळाला लागेनासे झाले आहेत़ विशेष म्हणजे महसूलमधीलच काही कर्मचाºयांची वाळूमाफियांसोबत उठबस असल्याने जिल्हाधिकाºयांच्या कारवाईचा व्यापक परिणाम दिसून येत नाही़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूsarpanchसरपंच