परभणी : वेदनेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:47 IST2019-07-30T00:46:46+5:302019-07-30T00:47:50+5:30
डॉक्टरांनी रुग्णांच्या शरीरात उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना व्यवस्थित समजून घ्याव्यात आणि वेदनाशामक औषधांचा आवश्यक तिथेच वापर करावा. तसेच वेदनेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, असे आवाहन डॉ. गिरीष वेलणकर यांनी केले.

परभणी : वेदनेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : डॉक्टरांनी रुग्णांच्या शरीरात उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना व्यवस्थित समजून घ्याव्यात आणि वेदनाशामक औषधांचा आवश्यक तिथेच वापर करावा. तसेच वेदनेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, असे आवाहन डॉ. गिरीष वेलणकर यांनी केले.
आयुर्वेद व्यासपीठच्या वतीने आयोजित स्व.वैद्य बिंदूमाधव कट्टी प्रबोधन व्याख्यानमालेत प्रमुख वक्ता म्हणून डॉ. वेलणकर बोलत होते. वैद्य सुप्रिया वाईकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.मीनाक्षी राऊत यांनी प्रास्ताविक केले.
डॉ.अंजली उंडेगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ.विजयमाला आसेगावकर यांनी धन्वंतरी स्तवन सादर केले.
डॉ.स्मिता कुलकर्णी यांनी गुरुवंदना घेतली. वैद्य प्रसाद काळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी डॉ. चारुशीला जवादे, डॉ.सुरेश शिवणीकर, डॉ.अनिल रामपूरकर, डॉ. सुचिता चांडक आदींनी प्रयत्न केले.