परभणीचे सीईओ बी.पी. पृथ्वीराज यांची लातूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:08 IST2020-12-08T14:07:40+5:302020-12-08T14:08:39+5:30

सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव (सेवा) सुजाता सौनिक यांनी ८ डिसेंबर रोजी पृथ्वीराज यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.

Parbhani CEO B.P. Prithviraj transferred as District Collector of Latur | परभणीचे सीईओ बी.पी. पृथ्वीराज यांची लातूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली

परभणीचे सीईओ बी.पी. पृथ्वीराज यांची लातूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली

ठळक मुद्देपृथ्वीराज यांच्या जागी एस.टी. टाकसाळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती

परभणी : येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांची लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव (सेवा) सुजाता सौनिक यांनी ८ डिसेंबर रोजी पृथ्वीराज यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. पृथ्वीराज यांच्या जागी एस.टी. टाकसाळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांच्या सल्ल्याने सीईओ पदाचा पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून जी. श्रीकांत यांच्याकडून लातूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारावा, अशा सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत.

Web Title: Parbhani CEO B.P. Prithviraj transferred as District Collector of Latur