परभणी : झुलेलाल जयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 22:58 IST2019-04-07T22:58:47+5:302019-04-07T22:58:54+5:30
पू.सिंधी पंचायत आणि संत कवंरराम सेवा मंडळाच्या वतीने ६ एप्रिल रोजी झुलेलाल जयंती व चेट्रीचंड्र उत्सव साजरा करण्यात आला.

परभणी : झुलेलाल जयंती उत्साहात साजरी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पू.सिंधी पंचायत आणि संत कवंरराम सेवा मंडळाच्या वतीने ६ एप्रिल रोजी झुलेलाल जयंती व चेट्रीचंड्र उत्सव साजरा करण्यात आला.
यानिमित्त येथील वडगल्लीतील झुलेलाल मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी पंचामृत स्रान, सायंकाळी आरती, भजन, कीर्तन, अडदास, बहेराना साहेबची पूजा आदी कार्यक्रमांना समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळच्या वेळी प्रमुख मार्गावरुन शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्राही शहरवासियांसाठी आकर्षण ठरली. शोभायात्रे दरम्यान सजीव देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले. जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांबरोबरच मॅरेथॉन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. जयंती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी दिलीप माटरा, खुबचंद मंगवानी, विवेक नारवानी, माया तलरेजा, काजल नारवानी यांच्यासह समाजबांधवांनी प्रयत्न केले.