Parbhani: CCTV camera emphasizes city security | परभणी : सीसीटीव्ही कॅमेऱ्याने शहर सुरक्षेत पडली भर

परभणी : सीसीटीव्ही कॅमेऱ्याने शहर सुरक्षेत पडली भर

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने शहराच्या सुरक्षेत भर पडली आहे. शिवाय पोलीस प्रशासनाला तपासासाठी मदत झाली आहे.
प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना मागील काही वर्षांपासून अंमलात आणली जात आहे. या अंतर्गत शहरात ठिकठिकाणी ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होेते. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी यातील अनेक कॅमेरे नादुरुस्त झाले. परिणामी पोलीस प्रशासनाच्या अडचणीत वाढल्या होत्या. त्यामुळे शहरात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता भासत असल्याने जिल्हा पोलीस दलाने या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला. या प्रस्तावास मंजुरी मिळून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून काही महिन्यांपासून शहरात नव्याने कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे कॅमेरे बसविताना शहरात येणारे सर्वच प्रमुख मार्ग कॅमेºयांच्या नजरेत येतील, याची काळजी घेण्यात आली. गंगाखेड रोड, वसमतरोड, जिंतूर रोड आणि पाथरी रस्त्यावर हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बसविलेले कॅमेरे दीर्घकाळ टिकतील याची काळजी घेण्यात आली आहे. जास्तीत जास्त क्षेत्र कॅमेºयांच्या नजरेत येईल, या उद्देशाने सिमेंट काँक्रेट बेस तयार करुन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच कॅमेºयांची लेन्स उच्च प्रतिची आणि रात्रीच्या वेळीही छायाचित्रण होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या कॅमेºयांच्या तुलनेत हे कॅमेरे अधिक प्रभावी झाले आहेत. शहरात कॅमेरे बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, या कॅमेºयांमुळे शहर सुरक्षेत अधिक भर पडली आहे. शहरातील प्रमुख मार्गाबरोबरच बसस्थानक, रेल्वेस्थानक, शिवाजी चौक, राजगोपालाचारी उद्यान, उड्डाणपूल, विसावा कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अशा प्रमुख ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आल्याने हा सर्व भाग आता निगराणीखाली आला आहे.
जुन्या कॅमेºयांचीही होणार दुरुस्ती
४शहरात यापूर्वी ३६ सीसीटीव्ही कॅमरे बसविले होते. मात्र यातील अनेक कॅमेरे सद्यस्थितीला बंद अवस्थेत आहेत. या कॅमेºयांची वेळेत दुरुस्ती करणे गरजेचे आहे. जुने कॅमेरे दुरुस्त करुन कार्यान्वित केले तर शहरातील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होऊ शकते. त्यामुळे जुन्या कॅमेºयांच्या दुरुस्तीसाठी देखील प्रयत्न होण्याची गरज आहे.
४२ सीसीटीव्ही कॅमेºयांची उभारणी
४शहरातील प्रमुख मार्ग आणि चौकात ४२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यातील दोन कॅमेरे दंगा नियंत्रण पथकाच्या वाहनावर आहेत. ४ मेगा पिक्सल, नाईट व्हीजन आणि बुलेट कॅमेरे असल्याने या कॅमेºयांचा दर्जा उच्चप्रतिचा आहे. याशिवाय वसमत रोडवरील कृषी विद्यापीठ गेट आणि राजगोपालाचारी उद्यानाजवळ पीटीझेड कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
४हे कॅमेरे १८० डिग्रीमध्ये फिरतात त्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्र या कॅमेºयांत अंतर्भूत होत आहे. विशेष म्हणजे, या सर्व कॅमेºयांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वातानुकूलीत नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी चार एलईडी स्क्रिन बसविले असून, एकाच ठिकाणाहून संपूर्ण शहरातील हालचालींवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे.
कॅमेºयांची संख्या वाढविण्याची गरज
४दर्गारोड, धार रोड, उड्डाणपुला खालील बाजू, खंडोबा बाजार, शनिवार बाजार, नांदखेडा रोड या भागात मोबाईल, पॉकेट चोरीचे प्रकार नित्याचे आहेत. या भुरट्या चोºयांवर आळा घालण्यासाठी या भागातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.
४त्याचप्रमाणे शहरातील बँका, प्रमुख कार्यालये, मोठ्या व्यापारी प्रतिष्ठानांच्या बाहेरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे बंधनकारक केल्यास चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. शिवाय घडलेल्या घटनांचा तपास लावतानाही पोलीस प्रशासनाला मदत होणार आहे.

Web Title: Parbhani: CCTV camera emphasizes city security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.