शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

परभणी : जात पडताळणी प्रमाणपत्र ; ४७१ सदस्यांना शासनाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:53 AM

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाने घेतल्याने हे प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सुमारे ४७१ सदस्यांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाने घेतल्याने हे प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सुमारे ४७१ सदस्यांना दिलासा मिळाला आहे.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राखीव जागेवरुन निवडून आलेल्या सदस्यांना त्यांच्या जातीचे पडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यात सादर करणे बंधनकारक आहे. मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द ठरविले जाते. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच अशा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत सादर न केलेल्या सदस्यांची धाकधूक वाढली होती. परभणी जिल्ह्यात आॅक्टोबर २०१७ मध्ये १२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत ४९० सदस्य राखीव जागेवरुन विजयी झाले. त्यातील केवळ ५३ सदस्यांनी नामनिर्देशनपत्रासोबतच आणि २० सदस्यांनी सहा महिन्यांच्या मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले होते. तब्बल ४३७ सदस्यांनी मुदत संपल्यानंतरही हे प्रमाणपत्र दाखल केले नसल्याने त्यांचे सदस्यत्व धोक्यात आले होते. जिल्हा परिषदेत २३ सदस्य राखीव जागेवरुन निवडून आले आहेत. त्यापैकी २० सदस्यांनी मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केले. मात्र ३ सदस्यांनी मुदत संपल्यानंतरही हे प्रमाणपत्र दाखल केले नव्हते.जिल्ह्यातील सात नगरपालिका आणि एका नगरपंचायतीत ७० सदस्य राखीव जागेवरुन निवडून आले आहेत. यापैकी ४२ सदस्यांनी सहा महिन्यांच्या मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केले होते. २० सदस्यांनी मुदतीनंतर हे प्रमाणपत्र दाखल केले तर ८ सदस्यांनी अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्रच दाखल केले नव्हते. महानगरपालिकेत एका सदस्याचे सदस्यत्व जात वैधता प्रमाणपत्र सादर नसल्याने अवैध ठरविण्यात आले आहे. तर दोन सदस्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत दाखल झाले नाहीत. मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल न केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची संख्या सुमारे ४७१ एवढी आहे. राज्य शासनाने हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याने या सर्वपक्षीय सदस्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCaste certificateजात प्रमाणपत्रElectionनिवडणूक