परभणीतील प्रकरण : विनयभंग प्रकरणी आरोपीस शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:35 IST2019-01-22T00:34:27+5:302019-01-22T00:35:04+5:30
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस परभणी येथील न्यायालयाने २१ जानेवारी रोजी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे

परभणीतील प्रकरण : विनयभंग प्रकरणी आरोपीस शिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस परभणी येथील न्यायालयाने २१ जानेवारी रोजी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी येथील नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये १६ मे २०१७ रोजी आरोपी अमोल नागोराव रायबोले (रा.सारंगनगर) याच्याविरुद्ध विनयभंग, बाललैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक राजेश मलपिल्लू यांनी या प्रकरणाचा तपास करुन दोषारोपपत्र जिल्हा न्यायालय वर्ग २ यांच्या न्यायालयात दाखल केले. साक्षी पुराव्यांची तपासणी केल्यानंतर २१ जानेवारी रोजी न्या. सी.एम.बागल यांनी आरोपी अमोल नागोराव रायबोले यास पोक्सो कायद्यांतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. तर सरकार पक्षाची बाजू के.एस. जोशी यांनी मांडली.