परभणीत बडतर्फ वाहकाने केला आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:35 IST2017-12-21T00:35:02+5:302017-12-21T00:35:10+5:30
हिंगोली आगारातील एका बडतर्फ वाहकाने सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी बुधवारी विभागीय कार्यशाळेच्या परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. काही सतर्क नागरिक व पोलिसांनी धाव घेतल्यामुळे अनर्थ टळला.

परभणीत बडतर्फ वाहकाने केला आत्मदहनाचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : हिंगोली आगारातील एका बडतर्फ वाहकाने सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी बुधवारी विभागीय कार्यशाळेच्या परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. काही सतर्क नागरिक व पोलिसांनी धाव घेतल्यामुळे अनर्थ टळला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागात हिंगोली येथील आगारातील वाहक म्हणून सेवेत असलेले डी.यू.शिसोदिया यांना काही महिन्यांपूर्वी सेवेतून बडतर्फ केले होते. त्यामुळे शिसोदिया हे त्रस्त होते. आपल्याला सेवेत घ्यावे, यासाठी त्यांनी वारंवार पाठपुरावा केला. परंतु, त्यांना यश आले नाही. त्यामुळे शिसोदिया यांनी विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. २० डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता शिसोदिया यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने पकडून आत्मदहनापासून परावृत्त करण्यात आले. या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.