शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

परभणीत बस स्थानकातील उभ्या बसला आग;जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 10:50 AM

बसमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा नव्हती

परभणी : शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या बस मधील इंजिनला अचानक आग लागल्याने चालकाची केबिन जळून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.      

बीडहुन किनवटकडे जाणारी एमएच 20 बीएल 1906 क्रमांकाची बस मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास परभणी बस स्थानकात दाखल झाली. यावेळी यावेळी आतील प्रवासी उतरत होते तर खाली उभे असलेले प्रवासी बस मधील प्रवासाच्या उतरण्याची वाट पाहत होते. तर चालक व वाहक बसमधून खाली उतरले. त्याचवेळी अचानक चालकाच्या केबिनमधून धूर येऊ लागला. काही प्रवाशांच्या लक्षात ही बाब येताच आरडा ओरड सुरू झाली. त्याच वेळी केबिनमधील इजिनने पेट घेतला. त्यामुळे गोंधळ करीत वेगाने प्रवासी बस मधून उतरले. बस स्थानकात आग विझवणारी यंत्रणा तात्काळ उपलब्ध नसल्याने मनपाच्या अग्निशमन दलाच्या बंबास पाचारण करण्यात आले. काही क्षणातच हा बंब बस स्थानकात दाखल झाला. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. तो पर्यंत चालकाची केबिन  जळून खाक झाली होती. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

टॅग्स :fireआगparabhaniपरभणीstate transportएसटी