शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

परभणी : मोंढा बाजारात आर्थिक उलाढालीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:06 AM

पावसाळ्यातील एक नक्षत्र संपल्यानंतर मान्सूनचा पाऊस झाला नसल्याने येथील बाजार समितीत कृषी निविष्ठांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. बळीराजा पावसाच्या तर व्यापारी बळीराजाच्या प्रतीक्षेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पावसाळ्यातील एक नक्षत्र संपल्यानंतर मान्सूनचा पाऊस झाला नसल्याने येथील बाजार समितीत कृषी निविष्ठांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. बळीराजा पावसाच्या तर व्यापारी बळीराजाच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हे दोन महत्त्वपूर्ण हंगाम असून खरीप हंगामात जिल्हाभरात ७० ते ८० कोटी रुपयांची उलाढाल होते. वर्षभरापासून जिल्ह्यातील कृषी बाजारपेठ ठप्प आहे. या पावसाळ्यात खरीप हंगामासाठी व्यापाऱ्यांनी तयारी केली आहे. महिनाभरापासूनच कोट्यवधी रुपयांचा माल परभणीच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. खत, बियाणे, कीटकनाशके मूबलक प्रमाणात व्यापाऱ्यांनी उपलब्ध केले असले तरी अजूनही शेतकरी बाजारपेठेत खरेदीसाठी दाखल झाला नाही. यावर्षी ८ जूनपासून पावसाळ्याला प्रारंभ झाला असला तरी अद्यापपर्यंत जिल्ह्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंता लागली आहे. मोठा पाऊस झाल्यास शेतकरी पेरणीच्या तयारीला लागतील; परंतु, दररोज आभाळ भरुन येत असून पाऊस हुलकावणी देत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सर्वच दुकानांमध्ये शांतता दिसून आली. खरेदी- विक्री होत नसल्याने व्यापारी, मजूर मंडळी हातावर हात देऊन बसून आहेत. बाजार समिती भागात सुमारे १२५ कृषी निविष्ठा विक्रेते असून त्यातील ३० दुकानांतून खतांची विक्री होते. तर उर्वरित दुकानांतून बियाणे आणि कीटकनाशके विक्री केली जाते. पाऊस पडल्यानंतरच या दुकानांमध्ये खरेदीसाठी लगबग सुरु होईल, असे चित्र आहे.सध्या तरी परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या नव्या मोंढ्या शुकशुकाट दिसून आला़ शेतकरी बाजारपेठेत येत असले तरी केवळ बियाणे आणि खतांचे दरांबाबत विचारपूस केली जात आहे़ प्रत्यक्षात खरेदी मात्र होत नाही़ त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या कृषी निविष्टा सध्या तरी दुकानांमध्ये पडून आहेत़ मान्सूनच्या पावसानंतरच प्रत्यक्षात उलाढाल वाढणार आहे़सोयाबीनसह इतर कृषी निविष्ठाची विक्री ठप्पकापूस आणि खताची विक्री काही प्रमाणात झाली असली तरी सोयाबीनची विक्री मात्र ठप्प आहे. कापूस आणि सोयाबीन हे दोन जिल्ह्यातील दोन नगदी पिके असून या पिकांची उलाढालच सर्वाधिक होते. पाऊस नसल्याने ही उलाढाल ठप्प आहे. पाऊस आणखी लांबला तर तूर आणि मुगाचे बियाणे विक्री होतात की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. एकंदर जिल्ह्यातील कृषी बाजारपेठेत शुकशुकाट असून पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकºयांना लागली आहे.२ लाख पाकिटे कापूस बियाणांची विक्रीच्जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस झाला नसला तरी काही भागात पूर्व मान्सून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसावर शेतकºयांनी धूळ पेरणी करण्याचा धोका पत्कारला आहे.च्मागील वर्षी ज्या शेतकºयांनी धूळ पेरणी केली होती, अशा शेतकºयांच्या कापसाला चांगला उतारा आल्याने अनेक शेतकºयांनी यावर्षी देखील धूळ पेरणी केली आहे. जिल्ह्यात साधारणत: ५ लाख कापूस पाकिटांची खरीप हंगामामध्ये विक्री होते.च्यावर्षी सर्व साधारणपणे २ लाख कापूस पाकिटांची विक्री झाली असून त्यातून सरासरी ३५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती विक्रेते रमेशराव देशमुख यांनी दिली.४० टक्के खताची विक्रीच्येथील बाजार समिती परिसरात बियाणे, कीटकनाशकांची विक्री झाली नसली तरी श्ोतकºयांनी खत मात्र खरेदी केला आहे.च्बाजार समिती परिसरात उपलब्ध असलेल्या खतांपैकी सुमारे ४० ते ५० टक्के खत विक्री झाला आहे. त्यातून साधारणत: ३० कोटी रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारFarmerशेतकरी