लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मोटारसायकलची चोरी करणाºया दोन आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ७ मे रोजी पाथरी येथून ताब्यात घेतले आहे़जिल्ह्यात मोटारसायकलची चोरी करणाºया आरोपींसंदर्भात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने माहिती मिळविली़ खबºयामार्फत मिळालेल्या या माहितीनुसार रमेश मारोती शिंदे (रा़ सागर कॉलनी, पाथरी) आणि पप्पू उर्फ मारोती गंगाराम झाकने (रा़ पाटोदा जि़जालना) या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले़पोलिसांनी या आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी नवा परभणी येथील मोंढा पोलीस ठाणे, सेलू, मंठा, सातोना (जि़जालना), शिरसाळा (जि़बीड) आदी ठिकाणाहून सात मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली़विशेष म्हणजे, या सातही मोटारसायकल पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केल्या आहेत़ सुमारे २ लाख १० हजार रुपयांचा जप्त केला असल्याची माहिती स्थागुशाच्या पथकाने दिली.पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीर फारुखी, शंकर गायकवाड, अरुण कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली़
परभणी : दुचाकी चोरणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:26 IST