परभणी : दुचाकी अपघात; वडील ठार, मुलगा गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 23:18 IST2019-04-22T23:17:05+5:302019-04-22T23:18:14+5:30
पालम ते लोहा मार्गावर आईनवाडी फाट्यानजीक स्कॉर्पियो- दुचाकीच्या अपघातात वडील जागेवरच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पुयनी गावावर शोककळा पसरली.

परभणी : दुचाकी अपघात; वडील ठार, मुलगा गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): पालम ते लोहा मार्गावर आईनवाडी फाट्यानजीक स्कॉर्पियो- दुचाकीच्या अपघातात वडील जागेवरच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पुयनी गावावर शोककळा पसरली.
पालम तालुक्यातील पुयनी येथील गोपाळ पुंडलिक शिंदे (५०) व भागवत गोपाळ शिंदे (१८) हे दोघे पिता-पुत्र दुचाकीने (क्रमांक एम.एच.२२- ए.एस.१३२९) लोहा गावाकडे जात होते. स्कॉर्पियो (क्रमांक एम.एच.२२- एएम. २१६१) ही गाडीही पालमहून लोह्याकडे जात होती. दरम्यान, आईनवाडी फाट्यानजीक दोन्ही वाहनांत अपघात झाला.
या अपघातात दुचाकीवरील गोपाळ पुंडलिक शिंदे (५०) हे जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा भागवत शिंदे हा गंभीर जखमी झाला. भागवत शिंदे यास पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. गोपाळ शिंदे यांच्यावर पालम येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.