शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मांडवा येथे ४ एकरावरील केळीची बाग करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:17 IST

सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीचा फटका आता बागायती पिकांनाही बसू लागला आहे. तालुक्यातील मांडवा परिसरात चार एकरवरील केळीची बाग पाण्याअभावी करपल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीचा फटका आता बागायती पिकांनाही बसू लागला आहे. तालुक्यातील मांडवा परिसरात चार एकरवरील केळीची बाग पाण्याअभावी करपल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.जिल्ह्यात मागील वर्षीच्या पावसाळ्यात परतीचा पाऊस न झाल्याने त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. रब्बीच्या हंगामावर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले. तसेच पावसाअभावी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. परिणामी सिंचनासह पाण्याचा प्रश्न जिल्हावासियांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर आतापर्यंत फळबागा जगविल्या. मात्र दोन महिन्यांपासून भूजलपातळीत मोठी घट झाल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. मांडवा येथील केशव उद्धवराव आरमळ व रघुनाथ उद्धवराव आरमाळ यांनी चार एकरवर केळीची लागवड केली होती; परंतु, पाण्याअभावी केळीची झाडे करपली आहेत. फळबाग लागवड करण्यासाठी आतापर्यंत ३ लाख रुपयांचा खर्च झाला. निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडले असते तर या बागा वाचल्या असत्या; परंतु, अद्यापपर्यंत पाण्याचे नियोजन नसल्याने केळीच्या बागा संकटात सापडल्या आहेत. दरम्यान, आरमळ यांनी या प्रकरणी तहसीलदारांना निवेदन दिले असून जळालेल्या केळी बागांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.विमा संरक्षण नसल्याने शेतकºयांना बसतोय फटका४फळपिकांना विम्याचे संरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र बागायती शेतीसाठी विमा संरक्षण नसल्याने झालेले नुकसान शेतकºयांनाच सहन करावे लागत आहे.४तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या भागातील बागायती पिकांचा पंचनामा करुन हेक्टरी मदत जाहीर करावी, अशी मागणी बागायतदार शेतकºयांकडून केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाईFarmerशेतकरी