परभणी : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांत जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 11:22 PM2020-03-05T23:22:08+5:302020-03-05T23:22:45+5:30

जगभरात हलकल्लोळ माजविणाऱ्या कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रातही आढळल्याने येथील विविध शैक्षणिक संस्थांनी शाळेत कार्यशाळा घेऊन तज्ज्ञांमार्फत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले आहे़ आरोग्य विभागानेही शहरामध्ये जागोजागी होर्डिग्ज लावून जनजागृतीला सुरुवात केल्याने खबरदारीचे उपाय वाढले असल्याचे दिसत आहे़

Parbhani: Awareness among students for the prevention of corona | परभणी : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांत जागृती

परभणी : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांत जागृती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जगभरात हलकल्लोळ माजविणाऱ्या कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रातही आढळल्याने येथील विविध शैक्षणिक संस्थांनी शाळेत कार्यशाळा घेऊन तज्ज्ञांमार्फत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले आहे़ आरोग्य विभागानेही शहरामध्ये जागोजागी होर्डिग्ज लावून जनजागृतीला सुरुवात केल्याने खबरदारीचे उपाय वाढले असल्याचे दिसत आहे़
कोरोना या गंभीर आजाराचे रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याचे वृत्त येत असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे़ त्यातच शेजारच्या नांदेड जिल्ह्यात संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत़ येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, विसावा कॉर्नर या भागात हॉर्डिग्ज लावून नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याची माहिती दिली आहे़ शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले आहे़ सर्दी, खोकला असे आजार असल्यास मास्कचा वापर करावा, स्वत:ची, परिसराची स्वच्छता कशी राखावी, याविषयी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जात आहे़
येथील अद्वैता स्कूल आॅफ एक्सलन्स या शाळेत आठवडाभरापूर्वी कोरोना या आजाराविषयी कार्यशाळा घेण्यात आली़ आरोग्य विभागातील तज्ज्ञांसह पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले़ या आजाराची माहिती आणि प्रतिबंधात्मक उपाय याची माहिती दिली, असे संस्थेचे अध्यक्ष विशाल वट्टमवार यांनी सांगितले़ तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमध्येही हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवित जनजागृती केली जात आहे़
मास्कचे दर वाढले
४कोरोना या आजाराचा परभणी जिल्ह्याला कोणताही धोका नसला तरी नागरिकांनी आता काळजी घेण्यास सुरुवात केली आहे़
४सार्वजनिक ठिकाणी मास्क तोंडाला बांधून वावरणारे नागरिक जागोजागी दिसू लागले आहेत़ त्यामुळे मास्कला ही मागणी वाढत असल्याचे लक्षात येताच चार दिवसांपर्यंत ३ रुपयांना एक या प्रमाणे विक्री होणाºया मास्कचे दर १५ रुपयापर्यंत पोहचले आहेत़

Web Title: Parbhani: Awareness among students for the prevention of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.