परभणी : रिकाम्या आॅक्सिजन सिलिंडरमुळे रुग्णवाहिका दवाखान्यात परतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:26 IST2019-07-01T00:25:53+5:302019-07-01T00:26:42+5:30
अत्यवस्थ रुग्णाला परभणी येथे उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिकेतील आॅक्सिजनचे सिलिंडर रिकामे असल्याची बाब लक्षात आल्यानंतर अर्ध्या रस्त्यातून रुग्णवाहिका परत दवाखान्यात आणण्यात आली. ३० जून रोजी हा प्रकार घडला.

परभणी : रिकाम्या आॅक्सिजन सिलिंडरमुळे रुग्णवाहिका दवाखान्यात परतली
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): अत्यवस्थ रुग्णाला परभणी येथे उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिकेतील आॅक्सिजनचे सिलिंडर रिकामे असल्याची बाब लक्षात आल्यानंतर अर्ध्या रस्त्यातून रुग्णवाहिका परत दवाखान्यात आणण्यात आली. ३० जून रोजी हा प्रकार घडला.
बोरी येथील पूनम अशोक वाघमारे या महिलेला २९ जून रोजी रात्री १० वाजता प्रसुतीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. ३० जून रोजी या महिलेची प्रसुती झाली. मात्र जन्मलेल्या बाळाची प्रकृती गंभीर असल्याने बोरी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या बाळास परभणी येथे हलविण्याचा सल्ला दिला.
त्यामुळे रुग्णवाहिकेच्या सहाय्याने या बाळाला परभणी येथे आणले जात होते. ही रुग्णवाहिका अर्ध्या वाटेत आल्यानंतर रुग्णवाहिकेतील आॅक्सिजन सिलिंडर संपल्याची बाब नातेवाईकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. या प्रकारानंतर रुग्णवाहिका थेट माघारी फिरवत बोरी ग्रामीण रुग्णालयात आणली.
ग्रामस्थांनी स्वत: रुग्णालयातील स्टोअर रुममधून आॅक्सिजन सिलिंडर रुग्णवाहिकेत टाकले आणि त्यानंतर या रुग्णवाहिकेचा परभणीच्या दिशेने प्रवास सुरु झाला.
बोरी ग्रामीण रुग्णालयात आॅक्सिजन सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे ग्रामस्थांनी दवाखान्यात गर्दी केली होती. जि.प.तील राकाँचे गटनेते अजय चौधरी यांनी औषधी साठ्यांची तपासणी केली असता नुकतेच दोन आॅक्सिजन सिलिंडर उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली.
वैद्यकीय अधिकाºयाची नियुक्ती करा
४बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ते सातत्याने गैरहजर राहतात. त्यामुळे कर्मचाºयांवर नियंत्रण नाही. त्याचा फटका परिसरातील रुग्णांना सहन करावा लागत आहे. परिसरातील पंधरा ते वीस गावांतील रुग्ण बोरी येथील ग्रामीण रुग्णालयासाठी रात्री-अपरात्री उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र कारभार ढासळल्याने रुग्णांना असुविधांना सामोरे जावे लागते. तेव्हा कायमस्वरुपी वैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.
बोरी ग्रामीण रुग्णालयात आॅक्सिजन सिलिंडरचा साठा असतानाही रुग्णवाहिकेसोबत रिकामे सिलिंडर पाठविण्यात आले. या प्रकारास जबाबदार असणाºया कर्मचाºयांवर कायदेशीर कारवाई करावी.
-अजय चौधरी, जि.प. गटनेते