परभणी: दंड भरल्यानंतर ३० आॅटो सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:39 IST2019-08-21T00:39:03+5:302019-08-21T00:39:27+5:30
कागदपत्र तपासणीच्या नावाखाली जप्त करण्यात आलेले शहरातील जवळपास ३०० पैकी ३० आॅटो संबंधितांनी दंड भरल्यानंतर सोडून देण्यात आले आहेत.

परभणी: दंड भरल्यानंतर ३० आॅटो सोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कागदपत्र तपासणीच्या नावाखाली जप्त करण्यात आलेले शहरातील जवळपास ३०० पैकी ३० आॅटो संबंधितांनी दंड भरल्यानंतर सोडून देण्यात आले आहेत. तशी माहिती सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली़
परभणी शहरातील जवळपास ३०० आॅटो १६ ते १८ आॅगस्ट या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कागदपत्र नसल्याच्या कारणावरून जप्त केले आहेत़ या कारणावरून शहरातील आॅटो चालकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता़ या पार्श्वभूमीवर सोमवार व मंगळवार असे दोन दिवस शहरातील जवळपास ३० आॅटो चालकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे दंडाची रक्कम भरली़ त्यानंतर सदरील आॅटो सोडून देण्यात आले़ जे जे आॅटो चालक दंडाची रक्कम भरू इच्छितात, त्यांच्याकडून दंड भरून घेण्यात आला व त्यांना या संदर्भात ताकीद देऊन सोडून देण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली़
राज्याच्या गृह विभागाने खाजगी संवर्गातील नोंदणी असलेल्या आॅटोरिक्षांना परवाने देण्या संदर्भात ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सोमवारी घेतला होता़ या अनुषंगाने पहिल्या दिवशी एकही अर्ज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे आला नाही़