परभणी :बलात्कार प्रकरणी आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:13 IST2018-01-22T00:13:13+5:302018-01-22T00:13:50+5:30
औरंगाबाद येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी इरफान उर्फ बाबा अमीरोद्दीन यास नानलपेठ पोलिसांनी अटक केली आहे़

परभणी :बलात्कार प्रकरणी आरोपीस अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : औरंगाबाद येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी इरफान उर्फ बाबा अमीरोद्दीन यास नानलपेठ पोलिसांनी अटक केली आहे़
या संदर्भात माहिती अशी की, पीडित मुलीच्या पित्याने त्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार १२ जानेवारी रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती़ पोलीस या मुलीचा शोध घेत असतानाच औरंगाबाद रेल्वे पोलिसांना ही मुलगी स्थानकावर आढळली़
औरंगाबाद पोलिसांनी १९ जानेवारी रोजी नानलपेठ पोलिसांशी संपर्क साधला़ पोलीस कर्मचारी रणखांब व महिला पोलीस कर्मचारी आव्हाड यांनी या मुलीला ताब्यात घेतले़ त्यानंतर या पीडित मुलीने आरोपी इरफान उर्फ बाबा अमीरोद्दीन याने माझ्यावर औरंगाबाद येथे बलात्कार केल्याचे पोलिसांना सांगितले़ त्यावरून बाल लैंगीक अत्याचार कायदा आणि बलात्कार प्रकरणी आरोपी इरफान याच्याविरूद्ध कलम वाढविण्यात आले़ या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे यांनी गंगापूर तालुक्यातील जांभळा येथून इरफान यास अटक केली़ २० जानेवारी रोजी इरफान याला न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़