शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ९ गावांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:14 IST

मार्च महिन्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज बिलासंदर्भात कडक मोहीम राबविण्यात येत असून सव्वा कोटी रुपये वीज बिलाच्या थकबाकीपोटी तालुक्यातील नऊ गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : मार्च महिन्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज बिलासंदर्भात कडक मोहीम राबविण्यात येत असून सव्वा कोटी रुपये वीज बिलाच्या थकबाकीपोटी तालुक्यातील नऊ गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत असल्याचे दिसून येत आहे.वीज वितरण कंपनीने पूर्णा शहर व ग्रामीण भागामधील वीज बिल वसुली मोहीम सुरू केली आहे. यासाठी विविध भागांत पथक तयार केले असून या पथकाच्या माध्यमातून वीज बिल वसुली करण्यात येत आहे. मागील एक वर्षापासून वीज बिल न भरणाऱ्या गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये सिरकळस, माखणी, खांबेगाव, धानोरा मोत्या, चांगेफळ, कंठेश्वर, आजदापूर, कानखेड- १, कानडखेड -२ या नऊ गावांचा मागील आठवड्यापासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून या नऊ गावांमध्ये वीज बिलापोटी १ कोटी ३० लाख रुपये थकित असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.पाणीटंचाईचे संकट४पूर्णा तालुक्यातील नऊ गावांमधील वीजपुरवठा महावितरणच्या वतीने खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. यापूर्वी अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता; परंतु, काही गावांनी अपेक्षित बिलाची रक्कम जमा केल्याने त्या गावातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वीज वितरण कंपनीने खंडित केलेल्या नऊ गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.वीजपुरवठा खंडित केलेल्या गावातील ग्रामस्थांना किमान मागील एक वर्षाचे वीज बिल भरणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी थकित वीज बिल भरल्यास महावितरणकडून नऊ गावांचा खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.-सचिन कल्याणकर,उपकार्यकारी अभियंता

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमनwater scarcityपाणी टंचाई