परभणीत ५७ पोते संशयास्पद गहू पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST2021-02-06T04:30:28+5:302021-02-06T04:30:28+5:30
परभणी शहरातील वसमत रस्त्याने टेम्पोमधून (क्र. एमएच २६ एच १९८६) रेशनचा गहू अवैधरीत्या नेला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या ...

परभणीत ५७ पोते संशयास्पद गहू पकडला
परभणी शहरातील वसमत रस्त्याने टेम्पोमधून (क्र. एमएच २६ एच १९८६) रेशनचा गहू अवैधरीत्या नेला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकास गुप्त सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार दुपारी १ वाजेच्या सुमारास वसमत रोड परिसरात संशयितवाहन अडवण्यात येऊन तपासणी करण्यात आली. त्यात जवळपास ४० ते ६० किलो वजनाचे एकूण ५७ पोते गहू आढळून आला. पोलिसांनी वाहनचालकाकडे कागदपत्रांची मागणी केली असता, त्याच्याकडे ती आढळून आली नाही. त्यामुळे संशयित वाहन ताब्यात घेऊन ते नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आता याबाबत तहसील कार्यालयास पत्र देऊन तो गहू रेशनचा आहे की नाही याबाबतची विचारणा करण्यात येणार असल्याचे समजते. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बापूराव दडस, फौजदार चंद्रकांत पवार, विश्वास खोले, पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने केली.